व्हॉट्सअॅप आपल्या युजर्सचं चॅटींग आणखी मजेशीर व्हावं यासाठी नवनवीन फीचर्स आणत असतं. यावेळी देखील व्हॉट्सअॅप आपल्या युजर्ससाठी स्टीकर्स फीचरमध्ये अपडेट आणत आहे. WABetaInfo ने दिलेल्या माहितीनुसार, व्हॉट्सअॅपमध्ये येणाऱ्या या नव्या अपडेटमध्ये ‘Sticker Notification Preview’ नावाचं नवं फीचर पाहायला मिळणार आहे. आयओएसच्या बीटा व्हर्जन 2.19.50.21 मध्ये हे फीचर देण्यात आले आहे. आता लवकरच अँड्रॉईड बीटावर देखील ते पाहायला मिळणार आहे.
‘Sticker Notification Preview’ हे फीचर व्हॉट्सअॅपवर आल्यानंतर अॅपवर एखादा मेसेज, स्टीकर, फोटो, व्हिडीओ आल्यावर नोटीफिकेशनमध्ये टेक्स्ट आणि इमोजी येणार आहे. स्टीकरसाठी नोटीफिकेशन बारमध्ये सध्या स्टीकर असं लिहिलेलं दिसतं. मात्र आता या नव्या फीचर नंतर युजर्सना पाठवलेला स्टीकर दिसणार आहे. तसेच मेसेज ओपन न करता कोणता स्टीकर पाठवण्यात आला आहे ते पाहता येणार आहे. व्हॉट्सअॅपचं नवं अपडेट गुगल प्ले स्टोरवर बीटा प्रोग्रामचा वापर करणाऱ्या युजर्ससाठी आले आहे. या व्हर्जनमध्ये स्टीकर प्रिव्यू फीचरची चाचणी करण्यात येत आहे. तसेच व्हॉट्सअॅप Animated stickers वर देखील काम करत असल्याची माहिती मिळत आहे.