Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, मे ०३, २०१९

तिच्या आधुनिक जीवनशैलीत चपखल बसणारा या तेलाचा नवा अवतार







कियारा अडवाणीने सर्वांसमोर आणले पॅराशूट अॅडव्हान्स्ड कोकोनट क्रेम ऑइल
मुंबई, ०३ मे २०१९: नव्याने अवगत केलेले रॅपिंग कौशल्य सर्वांना दाखवत बॉलिवूडची आजची सर्वांत प्रतिभावान अभिनेत्री कियारा अडवाणीने ऑइलिंगच्या एका नव्या पद्धतीचा अर्थात पॅराशूट अॅडव्हान्स्ड कोकोनट क्रेम ऑइलचा परिचय सर्वांना करून दिला. आपल्या शुष्क आणि रखरखीत केसांचे दु:ख कियाराने यापूर्वीही सर्वांपुढे व्यक्त केले होते आणि तिची आई सांगते त्याप्रमाणे तेल लावायला आपल्याला कसा वेळ मिळत नाही व त्यामुळे ते कसे कापून टाकावे लागतात हेही तिने सोशल मीडियावर सांगितले होते. या समस्येवर तिला अखेर उपाय सापडला आहे असे तिने आज सर्वांना सांगितले. हा उपाय म्हणजे पॅराशूट अॅडव्हान्स्ड कोकोनट क्रेम ऑइल. हा #OilKaNayaAvatar केवळ ३० मिनिटांत तेलाचे संपूर्ण पोषण केसांना देतो.



ज्यांना केसांना तेल लावायचे आहे पण व्यग्र जीवनशैलीमुळे हे करायला वेळच मिळत नाही असा एका वेळी अनेक गोष्टी करणाऱ्या मिलेनियल्ससाठी पॅराशूट अॅडव्हान्स्ड कोकोनट क्रेम ऑइल हे वन-स्टेप-सोल्युशन आहे. केसाला तेल चोळल्याने जी जादू होते ती पॅराशूट अॅडव्हान्स्ड कोकोनट क्रेम ऑइल एका नवीन युगाच्या फॉरमॅटमध्ये करून दाखवते. यामुळे केसांना खोबरेल तेलाची बळकटी तर मिळतेच, शिवाय नारळाच्या दुधाचा मुलायम स्पर्शही मिळतो. केस धुण्यापूर्वी लावण्याचे हे नरिशर अत्यंत हलक्या मखमली क्रेम ऑइलच्या रूपात उपलब्ध झाले आहे. ते लावण्यास अत्यंत सोपे आहे आणि केसांना १०० टक्के पोषण कोणत्याही प्रयत्नांशिवाय केवळ तीस मिनिटांत देते. हे क्रेम ऑइल अत्यंत हलके असल्याने केसात पटकन शोषले जाते आणि एकदा शॅम्पू केल्यानंतर सहज धुतलेही जाते. त्यामुळे अत्यंत व्यग्र दिनक्रमातही हे वापरणे सोयीस्कर आहे.



लाँचिंगच्या सोहळ्यात कियाराने अगदी सहज रॅपचा ताल पकडला आणि #OilKaNayaAvatar सापडल्याबद्दल तिने आनंद व्यक्त केला. हा नवा अवतार तिच्या दिनक्रमात चपखल बसणारा आहे आणि त्यामुळे तिला #RootedMyWay राहणे शक्य होत आहे. सोशल मीडियावर केस कापण्याचा खोडकरपणा केल्यानंतर कियारा अडवाणीने तिचे लांब, सुंदर केस सर्वांना दाखवले. केसांची काळजी घेण्याचा झटपट आणि विनाप्रयत्न उपाय शोधणाऱ्या प्रत्येक मिलेनियलची इच्छा व्यक्त करत रिहा चक्रवर्तीसारख्या आणखी एक-दोन अभिनेत्रींनी कियाराशी सहमती दर्शवली आणि त्यांनाही त्यांच्या केसांची काळजी घेण्यासाठी नवीन युगातील उपाय हवाच होता असे सांगितले.


आपल्या केसांची काळजी घेण्याच्या पद्धतीबद्दल कियारा अडवाणी म्हणाली, “माझ्या कामामुळे व्यग्र असलेल्या दिनक्रमात केसांची काळजी घेण्यासाठी वेळच उरत नव्हता. माझ्या केसांसाठी मुळात चांगल्या असलेल्या तेल लावण्यासारख्या गोष्टी नियमितपणे करणे जास्त कठीण होत चालले होते. पॅराशुट अॅडव्हान्स्ड कोकोनट क्रेम ऑइल खऱ्या अर्थाने #OilKaNayaAvatar आहे. हे क्रेम ऑइल केसांमध्ये इतक्या चटकन शोषले जाते की, ते लावून ठेवण्यासाठी केवळ तीस मिनिटे पुरेशी ठरतात. त्यामुळे मला रात्रभर तेल लावून न ठेवता किंवा ते धुण्यासाठी जास्तीचा वेळ न देता माझी दैनंदिन कामे करण्याचे स्वातंत्र्य मिळते. मी बहुतेक परंपरांवर आधुनिक उपाय शोधले आहेत, पण केसांना तेल लावण्यावर तो सापडत नव्हता. आता मात्र ती स्थिती उरलेली नाही!”



मिलेनिअल्सना त्यांच्या पोषण न मिळणाऱ्या केसांवर काहीच उपाय करणे शक्य होत नाही आणि म्हणून ते हेअरस्टायलिंगबाबत कशी टोकाची पावले उचलतात याबद्दलचे आपल्या करिअरमध्ये आलेले अनुभव डॉ. अपर्णा संथानम यांनी सांगितले. त्या म्हणाल्या, “आजच्या मुलींना त्यांच्या केसांची काळजी घेण्याची इच्छा आहे आणि केसांना पोषण देण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे व्यवस्थित तेल लावणे. या क्षेत्रात व्यावसायिक स्तरावर सहभागी असल्याने मी बघितले आहे की, मुली वेळेच्या अभावी तेल लावत नाहीत आणि त्याऐवजी अनेकविध उत्पादने वापरून बघतात. पॅराशुट अॅडव्हान्स्ड कोकोनट क्रेम ऑइल हा या तरुण मुलींसाठी नक्कीच उत्तम उपाय आहे. कारण, हा पर्याय त्यांच्या व्यग्र जीवनशैलीत चपखल बसणारा आहे. त्यांना अत्यंत कमी प्रयत्नांमध्ये केसांना तेल चोळण्याचे पोषण देणे यामुळे शक्य होणार आहे.”

"सध्याच्या जीवनशैलींमध्ये केसांना बऱ्याच गोष्टींतून जावे लागते. त्यामुळे मुलींचे प्राधान्य असते शुद्ध नैसर्गिक घटकांना. खोबरेल तेलाचे फायदे तर आपणा सर्वांना माहीतच आहेत. पण नारळाचे दूध हा घटक केसांच्या पोषणासाठी तर उत्तम आहेच, शिवाय ते केस मुलायम करते. त्यामुळे क्रेम ऑइलसारखा फॉरमॅट केसांना पोषणही देतो आणि त्यांचे रूपही सुधारतो."


पॅराशुट अॅडव्हान्स्ड कोकोनट क्रेम ऑइल #OilKaNayaAvatar या रूपात सादर करण्यात आले आहे. हे उत्पादन मिलेनियल्सना केसांना तेल चोळण्याच्या परंपरेशी जोडून ठेवते आणि आपल्या आधुनिक स्वरूपामुळे हे कमी वेळात शक्य करून सोयही बघते. हे उत्पादन ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्स तसेच महानगरांतील सर्व आधुनिक दुकानांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे.


महाराष्ट्र आणि बेंगळुरूमधील सर्व आधुनिक तसेच जनरल स्टोअर्समध्ये हे उत्पादन उपलब्ध आहे. शिवाय नायका, अमेझॉन आणि फ्लिपकार्ट या ई-कॉमर्स पोर्टल्सवर ते राष्ट्रीय स्तरावर उपलब्ध आहे. ग्राहक पॅराशुट अॅडव्हान्स्ड कोकोनट क्रेम ऑइलचे १५० मिलीचे पॅकिंग १२० रुपयांत तर ६० मिलींचे पॅकिंग ४९ रुपयांत खरेदी करू शकतात.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.