Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, मे ०८, २०१९

नागपुरात इंटरव्हूला जायला निघालेल्या तरुणीचा अपघातात मृत्यू

नागपूर/प्रतिनिधी:

मंगळवारी तिची नौकारीसाठीची मुलाखत होती.मन थोड घाबरले होते,दररोज प्रमाणे सकाळी उठून ती मस्तपैकी तयार झाली,आपली दुचाकी घेतली आणि एचडीएफसी बँकेत मुलाखतीसाठी निघाली.मनात मुलाखतीसाठीचे अनेक प्रश्न घोंगावत होते, मात्र मागून येणाऱ्या ट्रकचा घोंगावणारा आवाज तिच्या मुलाखतीच्या प्रश्नानसमोर विचारासमोर कमी पडला कि काय ?असाच काहीसा हृदयदावक किस्सा मंगळवारी तिच्या सोबत व बोरकर परिवारासोबत घडला,अन ती मुलाखत न देताच सर्वाना सोडून निघून गेली.

एचडीएफसी बँकेत मुलाखतीसाठी जात असताना नागपुरातील एका तरुणीच्या दुचाकीला भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली. यात तरुणीचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना आज मंगळवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास कामठी मार्गावरील भिलगाव परिसरात घडली. अर्पिता उर्फ अपराजीता नरेंद्र बोरकर (२४) रा. संताजीनगर, कन्हान असे मृत तरुणीचे नाव आहे.

अपराजीता ही आयसीआयसीआय बँकेत विक्री अधिकारी म्हणून कार्यरत होती. या मुलाखतीकरिता सकाळी १०.३० वाजता ती आपल्या एमएच-४०, एएस-५२४० क्रमांकाच्या मोपेडने नागपूरच्या दिशेने निघाली. तिला मुलाखतीच्या ठिकाणी वेळेत पोहोचायचे होते. परंतु ११ वाजताच्या सुमारास भिलगाव परिसरातील खरी फाटय़ाजवळ एमएच-४०, ए-५०० क्रमांकाच्या भरधाव ट्रकने तिला धडक दिली. यात ती गंभीर जखमी झाली. तिला मेयो रुग्णालयात हलवण्यात आले. पण, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला.

भरधाव ट्रकने दुचाकीस्वार युवतीला धडक दिल्यानंतर रस्त्यावरील नागरिकांनी लगेच घटनास्थळावर धाव घेतली. युवतीला उपचारासाठी नेण्याचा प्रयत्न करीत असताना युवतीचा मृत्यू झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे संतप्त नागरिकांनी ट्कचालकाला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो पळून गेला. त्यानंतर ट्रकची तोडफोड करण्याचा प्रयत्न करण्यात आला. 

या घटनेने अपघाताची माहिती मिळताच जरीपटका पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी गुन्हा दाखल करून ट्रकचालक गगणसिंह कुंदनसिंह सडू (२८) रा. खरी फाटा याला अटक केली.भरधाव ट्रकने दुचाकीस्वार युवतीला धडक दिल्यानंतर रस्त्यावरील नागरिकांनी लगेच घटनास्थळावर धाव घेतली. युवतीला उपचारासाठी नेण्याचा प्रयत्न करीत असताना युवतीचा मृत्यू झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे संतप्त नागरिकांनी ट्कचालकाला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो पळून गेला. त्यानंतर ट्रकची तोडफोड करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
दर्जेदार पोल्ट्रीफीड उपलब्ध 


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.