Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, एप्रिल २४, २०१९

मर्सिडीज-बेन्झ इंडियाच्या नागपुरातील दोन आऊटलेट्सचे उद्घाटन


नागपूर: मर्सिडीज-बेन्झ या भारतातील सर्वात मोठ्या लक्झ्युरी कार उत्पादक कंपनीने नागपुरात दोन अत्याधुनिक आऊटलेट सुरू करून या शहराप्रति असलेली बांधिलकी आणखी दृढ केली. हे भव्य शोरूम आणि प्रशस्त सेवा केंद्र भारतातील द्वितीय श्रेणी शहरातील सर्वाधिक वेगाने विकसित होणाऱ्या नागपूर शहराच्या मध्यवर्ती भागात आहे. विकसनशील बाजारपेठांवर मर्सिडीज-बेन्झ लक्ष केंद्रीत करत असल्याचे यातून अधोरेखित झाले आहे. ही नवी आऊटलेट नागपूर आणि आसपासच्या परिसरातील ग्राहकांच्या वाढत्या मागण्यांची पूर्तता करेल. या दोन्ही आऊटलेट्सचे उद्घाटन मर्सिडीज-बेन्झचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मार्टीन स्वेंक आणि सेंट्रल स्टारचे अध्यक्ष कार्नेल सिंग चीमा यांच्या हस्ते झाले.

मर्सिडीज-बेन्झचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मार्टीन स्वेंक म्हणाले, "आमचे नवे भागीदार गार्नेट मोटर्स यांच्यासह नागपूरच्या चोखंदळ ग्राहकांना सेवा देताना मर्सिडीज-बेन्झला अत्यंत आनंद होत आहे. नागपुरात लक्झ्युरी कार्सची मागणी वाढत आहे आणि अतुलनीय उत्पादन व सेवा यांच्या माध्यमातून या संधीचा लाभ घेण्याचा मर्सिडीज-बेन्झचा उद्देश आहे. या आऊटलेट्समधून आमच्या ग्राहकांना जागतिक ख्यातीची उत्पादने, अप्रतिम सेवा आणि रोमहर्षक ब्रँड अनुभव मिळेल. २०१९ हे मर्सिडीज-बेन्झचे भारतातील २५वे वर्ष आहे आणि आमच्या ग्राहकांना सतत आनंदी ठेवण्यासाठी नवी उत्पादने सादर करण्यासोबतच अनेक आकर्षक उपक्रम आम्ही आखले आहेत. आमचा ग्राहककेंद्री दृष्टिकोनासह आम्ही धोरणात्मकिरत्या नव्या तसेच आधीच्या बाजारपेठांमध्ये व्याप्ती वाढवत आहोत आणि ही दोन अत्याधुनिक, लक्झ्युरी आऊटलेट्स हा याच दृष्टिकोनाचा परिणाम आहे. स्थानिक तज्ज्ञता आणि आमच्या भागीदारांचे भक्कम संपर्कजाळे यामुळे या प्रदेशातील आमचे अस्तित्व अधिक बळकट होईल, असा आम्हाला विश्वास आहे."

ते पुढे म्हणाले, "नागपुरात आमच्या न्यू जनरेशन कार्सचे आकर्षण वाढत असल्याचे आम्ही अनुभवले. आमच्या एकूण विक्रीपैकी सुमारे ५० टक्के या भागातीलच आहे. जीएलए २५ टक्के विक्रीसह हे सर्वाधिक खपाचे मॉडेल आहे. त्यानंतर ई-क्लास सेदानचा क्रमांक आहे. त्याचप्रमाणे, नागपुरातील तरुण व्यावसायिक, डॉक्टर्स थ्री-पॉईंटेड स्टारला अधिक पसंती देत आहेत."

सेंट्रल स्टारचे अध्यक्ष श्री. कर्नेल सिंग चीमा म्हणाले. "मर्सिडीज-बेन्झ सारख्या ख्यातनाम ब्रँडसोबत भागीदारी करताना मला प्रचंड अभिमान वाटतो आणि या ब्रँडच्या देशातील यशोगाथेत सहभागी होण्यास आम्ही उत्सुक आहोत. शोरूम आणि फॅसिलिटी दोन्हीची रचना जागतिक दर्जाप्रमाणे करण्यात आली आहे आणि या भागातील सध्याच्या आणि संभाव्य ग्राहकांना आनंददायी, सहजसोपी सेवा देण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. या शोरूमची मोक्याची जागा या प्रगतीशील शहरासोबतच आसपासच्या भागाच्याही गरजा पूर्ण करेल आणि त्यातून ब्रँडचा अधिक विकास होईल."

सेंट्रल स्टार नागपूर ठळक वैशिष्ट्ये:

  • दोन्ही आऊटलेट्सच्या उभारणीसाठी ८.१५ कोटी रुपयांची गुंतवणूक
  • हे अत्याधुनिक शोरूम ६००० चौ. फुट जागेत पसरले आहे, इथे ९ गाड्या प्रदर्शनार्थ मांडता येतील, प्रशस्त कस्टमर लाऊंज, खास मर्कंडाइज अॅण्ड अॅक्सेसरी विभाग आणि कॅफे मर्सिडीजने सज्ज
  • सेवा विभाग तब्बल ४५००० चौ. फुटांमध्ये पसरला आहे. यातील १० बेजमध्ये पेंट अॅण्ड बॉडी, इन्स्पेक्शन बे आणि व्हील अलाइनमेंट बेचा समावेश। या डीलरशीपमध्ये कस्टमर लाऊंज, मर्चंडाइज अॅण्ड अॅक्सेसरी डीस्प्ले विभाग आणि ड्रायव्हर लाऊंजची सुविधा । इथे वर्षाला २४००० गाड्यांची सर्विसिंग होऊ शकते
  • शोरूम आणि सर्विस फॅसिलिटी या दोहोंची रचना मर्सिडीज-बेन्झच्या डिझाइन तत्वांप्रमाणे करण्यात आली आहे, यामुळे ग्राहकांना मिळणार लक्झ्युरिअस अनुभव
  • ४७ शहरांमधील ९६ आऊटलेटसह मर्सिडीज-बेन्झचे भारतातील लक्झ्युरी कार मार्केटमध्ये सर्वाधिक व्यापक जाळे

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.