Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, एप्रिल २२, २०१९

पिण्याच्या पाण्याची भिषण टंचाई; मडकाफोड आंदोलन

  • नगरपरिषदेवर शेकडो महिला धडकल्या मडके घेऊन

आठ दिवसांत टँकरने पाणी देऊ मुख्यधिकारी


चिमूर/रोहित रामटेके

    चिमूर शहरात पिण्याचे पाणी भिषणटंचाईचे चटके  सहन करीत  एप्रिल महिन्याच्या २२ तारीख उजाडली तरी चिमूर नगरपरिषदेच्या नियोजन शून्य कारभाराचा फटका नागरीकांना बसत असून पिण्याच्या पाण्यासाठी वनवन भटकावे लागत असून नळाला पुरेसे पाणी येत नाही या विरोधात आज २२ भाजपच्या नगरसेवकांनी सतीश जाधव नितीन कटारे याचे नेतृत्वाखाली  मडका फोड आंदोलन करीत नगरपालिका प्रशासनाचे लक्ष वेधत शेकडो महिलांनी पिण्याच्या पाण्यासाठी मुख्यधिकारी यांना धारेवर धरले मात्र नगराध्यक्ष व उपाध्यक्ष हजार नसल्याने मुख्यधिकारी रोषाला बळी पडले  काही वेळासाठी नगरपरिषदेच्या मुख्य दरवाजा बंद करण्यात आला होता मुख्यधिकारी यांनी आठ दिवसांत टँकर लावून पाणी देऊ अशी ग्वाही मुख्याधिकारी शाह यांनी दिली तेंव्हा कुठे महिला शांत झाल्या  .

. पाण्याची गरज वाढली असतानाच विहिरी व हातपंप खोलवर गेले असून पाण्याचे स्रोत आटायला लागले आहेत ५१कोटी रुपयांची २४/७ही पाणी पुरवठा मंजूर झालेली योजना नगरपरिषदच कोर्टात गेल्याने न्यायालयात अडकली आहे ज्या नगरपालिका ला शासनाने पिण्याच्या पाण्याची योजना मंजूर केली तीच नगरपालिका बांधकाम करण्याचे कारण पुढे करून योजना कोर्टात नेऊन ठेवली हे देशाच्या इतिहासातील दुर्मिळ घटना समजावी लागेल ।

.चिमूर शहरासह समाविष्ट अनेक गावातील पिण्याच्या पाणी पुरवठा योजना अपूर्ण असून कुठे पाईपलाईन अपूर्ण ,कुठे टाकी अपूर्ण तर कुठे विहीर अपूर्ण असे असताना त्या गावतील नागरिकांना या  उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी कसरत करावी लागत आहे  दूरवरून किंवा दुसऱ्या वॉर्डातून महिलांना पाणी आणावे लागत आहे.ही परिस्थिती एप्रिलमध्ये असून मे, जून हे उन्हाळ्यातील महिने बाकीच आहे .तालुका तीव्र दुष्काळ ग्रस्त असून नगरपरिषद प्रशासनाने वेळीच लक्ष देणे गरजेचे होते मात्र एप्रिलमध्ये भिषण पिण्याचे पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे तर पुढील महिने कसे काढायचे असा प्रश्न नागरिकांना पडला आज प्रभाग १०नगरसेवक सतीश जाधव , प्रभाग १५ चे नगरसेवक नितीन कटारे  आंबिद शेख अल्पसंख्याक अध्यक्ष ,हरीश पिसे भाजपा उपाध्यक्ष याचे नेतृत्वाखाली अनेक वॉर्डातील शेकडो महिला नगरपरिषद वर मडके ,घागरी,माठ घेऊन धडकल्या यात जेष्ठ महिला ,तरुणी ,महिलांचा समावेशासह जेष्ठ नागरिक व युवक सहभागी झाले होते .पाणी मिळणार नाही तोपर्यंत आम्ही हटणार नाही ,पाणी नाही टॅक्स नाही ,काम करता येत नाही तर खुर्ची खाली करा अशा घोषणा देत महिलांनी नगरपालिका समोर मडके फोडले , मुख्याधिकारी यांचे कक्षासमोरील पोर्च मध्ये मडके फोडून महिलांनी आपली तीव्र भावना व्यक्त केली .या आंदोलनात नगरसेवक गट नेता छाया कनचलवार ,नगरसेवक उषा हिवरकर नगरसेवक हेमलता ननावरे ,जयंत गौरकर , आदी शेकडो महिला उपस्थित होते 


५१ कोटी रुपयांचे योजनेचे का झाले नागरिकांचा मुख्यधिकारी यांना सवाल

चिमूर नगरपरिषद शहर व समाविष्ट करण्यात आलेल्या१३गावातील नागरिकांना २४तास७दिवस पिण्याचे पाणी मिळावे म्हणून आमदार कीर्तिकुमार भागडीय यांनी विषेश प्रयत्न करून राज्य शासनाकडून ५१कोटी रुपयांची योजना मंजूर करून आणली होती ती योजना  का झाली असा सवाल नागरीकांनी मुख्याधिकारी शाह यांना विचारला तेंव्हा ती योजना न्यायालयात असून न्यायालयाने जे आदेश देण्यात येईल तेव्हा पुढील कार्यवाही होईल असे सांगितले .


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.