Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, एप्रिल २२, २०१९

चंद्रपूर-नागपूर धावणाऱ्या खाजगी ट्रॅव्हल्सची महामंडळाच्या बसला धडक

नागपूर/ललित लांजेवार:
चंद्रपूर वरून नागपूर धावणाऱ्या DNR खाजगी ट्रॅव्हल्सची महामंडळाच्या बसला जबर धडक दिली.हैद्राराबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७ वरील शेडगाव चौरस्त्यावर हा अपघात घडला.सो
सोमवारी सकाळी साडेआठ वाजता DNR ट्रॅव्हल्स एम एच ३४ ए.व्ही १५७७ हि चंद्रपूर वरून नागपूर जात होती. वर्धा आगाराची वर्धा समुद्रपुर बस क्रमांक एम एच १४ बि.टी १२५२ ही बस समुद्रपुरकडे येत असताना बस शेडगाव रस्ता पार करीत असताना भरधाव वेगाने असलेल्या ट्रॅवल्सने बसच्या मागील भागाला जबर धडक दिली. 




या धडकेत मांडगाव वरुण समुद्रपुर येथील शाळेत येत असलेले विद्यार्थी अंजली तडस, वैष्णवी जोगे, वैष्णवी काटगुबे,अपेक्षा घुसे, रश्मी घुसे, मयुरी डफ, मयुरी तडस, वैशाली भगत, , सर्व राहणार मांडगाव व लता शास्त्रकार, बाबा शास्त्रकार, दोन्ही राहणार भुगाव व रामा विनायक बांधेकर रा नागपुर हे गंभीर जखमी झाले आहेत.जखमींना उपचारासाठी समुद्रपुर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे. 




SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.