पाण्याचे आंदोलन चिघळणार
चंद्रपूर - मागील काही वर्षांपासून चंद्रपूर शहरवासी पिण्याच्या पाण्याची झळ सोसत आहे, अनियमित पाणीपुरवठ्याने सर्व सामान्य नागरिक त्रासून गेला आहे, नळाला पाणी तब्बल 4 दिवसांनी येत आहे ते सुद्धा काहीवेळासाठी, यामुळे आज शहरात पाणी बाणी सारखी परिस्थिती उदभवली आहे. पाण्याची ही समस्या लक्षात घेतासामाजिक संगठण यंग चांदा ब्रिगेडने शहरातील नागरिकांना नियमित पाणी पुरवठा व्हावा यासाठी आता साखळीआंदोलनाच उभारण्याच काम सुरू केलेल आहे.साखळीच्या आंदोलनाची सुरुवात यंग चांदा ब्रिगेडच्या सदस्यांनी अध्यक्ष किशोर जोरगेवार यांच्यामार्गदर्शनाखाली पाणी पुरवठा कंत्राटदार यांच्या कार्यालयात धडक मारली व त्यांना याबाबत जाब विचारलं,कंत्राटदारांनी उडवा-उडवीची उत्तरे देत असल्याने यंग चांदा ब्रिगेडच्या सदस्यांनी कंत्राटदाराला 2 दिवसांचाअल्टीमेटम देत त्यांच्या कार्यालयाला दरवाज्यावर जोडे मारो आंदोलन केले. यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या सदस्यांनीनिदर्शने करीत शहरातील पाणी पुरवठा नियमित करण्याची मागणी केली अन्यथा रोज कार्यालयात येऊन आम्हीयाप्रकारे आंदोलन करून धडक मारू असा इशारा देण्यात आला. यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे इरफान शेख, राशेद हुसैन, वंदना हातगावकर, कल्याणी शिंदे, नंदा पंधरे, रुपा परसराम, कविता शुक्ला, अनिता देवतळे, पुष्पा प्रसाद, गीतारामटेके, किरण करमनकर, नीलिमा वनकर, राजू काळे, इमरान खान, मोहसीन खान, कुमार जुनमूलवार, हबीब भाईआदींची उपस्थिती होती.