Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, एप्रिल ०७, २०१९

परवानगी शिवाय वाहनावर झेंडे लावल्यास होणार कारवाई

चंद्रपूर/प्रतींनिधी:
पक्ष झेंडे साठी इमेज परिणाम
निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू असताना जिल्ह्यात फिरणाऱ्या खाजगी वाहनावर परवानगी शिवायकोणत्याही पक्षाचे अथया उमेदवाराचे प्रचार साहित्य लावल्यासआचारसंहितेचा भंग केल्या प्रकरणी कारवाई केली जाईल. तसेच प्रसार साहित्यावरील केलेला खर्च उमेद्वाराच्या खात्यात समाविष्ट करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी दिला आहे. निवडणुकीत खासगी वाहनांद्वारे प्रचार करायचा असेल तर त्या वाहनाची कायदेशोर परवानगी घेणे आवश्यक असते. अन्यथा आचारसंहितेचे उल्लंघन ठरते. शिवाय परवानगीशिवाय खाजगी वाहनांद्वारे प्रचार करत असताना त्यावर लावलेले पक्षाचे किंवा उमेदवारांचे झेंडे, फलक,स्टिकर आणि पत्रके लावल्यास सदरकृती आयपीसी धारा १७१ (ह) नुसार कारयाईसाठी पात्र ठरते, असेही स्पष्टकरण्यात आले आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.