Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, एप्रिल ०४, २०१९

गडचांदूरच्या ठाणेदारांनी बाल वसतिगृहात साजरा केला वाढदिवस

गडचांदूर/प्रतिनिधी:

 प्रहार संघटना हि नेहमी सामजिक बांधीलकी जोपासत असते.त्याला हेरूनच  दिनांक २/४/२०१९ ला गडचांदूर पोलीस स्टेशनचे कर्तव्य निष्ठ ठाणेदार मा श्री सुनील सिह पवार यांचा वाढदिवस जिजामाता बाल वसतिगृह येथे प्रहार संघटना व स्वयंभू दिव्यांग संस्था तर्फे वस्तीगृहोतील विद्यार्थ्यांना ठाणेदार  यांच्या हस्ते बुक पेन व चॉकलेट चे वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला, ठाणेदार सुनील सिह पवार म्हटले  आज पर्यंत मी असा माझा वाढदिवस साजरा केला नाही, परंतु प्रहार संघटनेने आज असा वाढदिवस बालगृहात बालमित्रांसोबत करून खूप आनंद होत आहे व समोर जेव्हा पण मला असा चान्स मिळेल तेव्हा तेव्हा माझा वाढदिवस बालमित्रांन सोबत साजरा करेन.  आयोजन खूप छान केले त्या बद्दल स्वयंभू दिव्यांग व प्रहार संघटनेचे तालुका अध्यक्ष सतिश बिडकर यांच आभार मानले.

यात प्रमुख उपस्थिती ठाणेदार मा श्री सुनीलसिह पवार व प्रहार संघटनेचे तालुका अध्यक्ष सतिश बिडकर, डॉ शैलेश विरुटकर , इजि. अरविंद वाघमारे , सागर गुडेल्लीवर सर , स्वयंभू दिव्यांग संस्था चे अध्यक्ष पंकज माणूसमारे, लिंगु महाराज, पोलीस कर्मचारी , वस्तीगृह कर्मचारी , प्रहार संघटचे पदाधिकारी व वसतिगृहातील विद्यार्थी उपस्थित होते.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.