Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, एप्रिल ०४, २०१९

चिमुरात वाघ पाहण्याची लोकांची अफाट गर्दी

वन विभाग दोन तास उशिरा 
चिमूर/रोहित रामटेके:

चिमुर तालुक्यातील तुकुम येथील अनेक दिवसापासुन वाघाचे दर्शन होत असुन, अस्यातच आज सकाळी अकराच्या दरम्यान तुकुम येथील तलावात महीला कपडे धुत होते आणि ईश्वर शेडामे गुरांना पाणी पाजत होते तेव्हा त्यांना झुडपात पटेदार वाघ दिसला, लगेच गावाकऱ्याना माहीती देण्यात आली आणि पट्टेदार वाघाला पाहण्याकरीता गर्दी लोकांची होऊ लागली यासंबधीत गावकऱ्यांनी वनपरी श्रेत्र कार्यालय चिमुर यांना माहीती दिली असता मात्र दोन तास उशिरा वन विभागाचे कर्मचारी घटणा स्थळी पोहोचले त्यामुळे वनविभाग वर गावकरी नाराज सुर दिसुन आले.

तुकुम परीसरात अनेक दिवसापासुन पटेदार वाघ आढळून येत आहे ०१/एप्रिल २०१९ रोज सोमवारला दयाराम गजभिये यांच्या शेतामध्ये तर अशोक विठोबा खिरडकर यांच्या गायीला पट्टेदार वाघाने ठार केले होते, यापुर्वी ही दिलीप सुर यांची गाय ठार केली. पट्टेदार वाघ हा दोन महीण्यापासुन परीसरात वास्तव्य करीत आहे.त्यामुळे परीसरात भितीचे वातावरण पसरले आहे.

ताडोबाच्या कोलारा प्रवेशद्वारापासून जवळच तुकूम तलाव परिसरात पट्टेदार वाघ दिसल्यानं लोकांत भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. तलावावर कपडे धुणाऱ्या महिलांना व ईश्वर शेडामे याना हा वाघ दिसल्यानंतर त्यांनी गावकऱयांना माहिती दिली. गावकऱयांनी आता वाघाला बघण्यासाठी गर्दी केली असून, वनविभाग व पोलीस विभाग या वाघावर लक्ष ठेवून आहे.

" तुकुम परिसरात अनेक दिवसापासून पेटदार वाघ वास्तव्य करीत असुन अनेकांचे शेतामध्ये गाय चा शिकार केला ताडोबा कोलारा गेटचा रहदारीचा मुख्य मार्गावर अनेकाना दिसत असतात त्यामुळे परीसरात शेतकरी, शाळेकरी विद्यार्थी, महीला मध्ये दहशतीचा वातावरण दिसुन येते त्यामुळे पटेदार वाघाला लवकरात लवकर वन विभागाने वाघाला ताब्यात घ्यावे अशी मागणी तुकुम व परीसरातील नागरीक जोर धरीत आहे 

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.