Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, एप्रिल २४, २०१९

चंद्रपूर जिल्हा क्रीडा कार्यालयामार्फत उन्हाळी शिबिर सुरु

लहान मुला-मुलींकरिता स्पोर्ट्स नर्सरी उपक्रम सुरू
चंद्रपूर/प्रतिनिधी:

 क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, चंद्रपूर तसेच जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्र, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा क्रीडा संकुल येथे जिम्नॅस्टिक खोखो व कराटे या खेळाचे दिनांक 25 एप्रिल ते 3 मे 2019 या कालावधीत दुसऱ्या निशुल्क उन्हाळी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन तसेच 4 ते 10 वर्ष या वयोगटातील लहान मुला-मुलींकरिता स्पोर्ट्स नर्सरी उपक्रम सुरू करण्यात येत आहे.

लहान मुलांमध्ये खेळाची आवड निर्माण व्हावी, त्यांना खेळाचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण मिळावे, तसेच शारीरिक व मानसिक दृष्ट्या सक्षम व्हावे. याकरिता शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. आजच्या या स्पर्धेच्या युगात अभ्यासाला केंद्रबिंदू मानून बाकी सर्व गोष्टीकडे दुर्लक्ष होत आहे. मोठ्या पदावर नोकरी लागणे यापलीकडे काहीच विचार होत नाही. पण त्या पदावर टिकून राहण्यासाठी शारीरिक व मानसिक आरोग्य सुस्थितीत असणे तेवढेच गरजेचे आहे. या धर्तीवरच व्यक्तीला अभ्यासाव्यतिरिक्त व्यायामाची सुद्धा सवय लागावी, याकरिता विविध खेळाचे उन्हाळी प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात येत आहे. पहिल्या उन्हाळी प्रशिक्षण शिबिरात खेळाडूंच्या उत्स्फुर्त प्रतिसादानंतर दुसरे उन्हाळी प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात येत आहे. या शिबिरात जिम्नॅस्टिक, खो-खो व कराटे या खेळाचे अद्ययावत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. शिबीराकरीता नोंदणी करण्यासाठी विद्यार्थ्यांनी जिम्नॅस्टिक प्रशिक्षणाकरिता सचिन मांडवकर 8408865870, खोखो प्रशिक्षणाकरिता अक्रम शेख 8208453499, कराटे प्रशिक्षणाकरिता संतोष कपडेवाले 7972234517 यांचेशी संपर्क साधावा.

सोबतच लहान मुलांमध्ये खेळाची आवड निर्माण व्हावी तसेच त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव मिळावा व मनोरंजनात्मक खेळाच्या माध्यमातून त्यांचा शारीरिक व मानसिक विकास व्हावा. याकरिता लहान मुलांना मुलींकरता स्पोर्ट्स नर्सरी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गिरीजा सिडाम यांच्यामार्फत स्पोर्ट्स नर्सरीमध्ये प्रशिक्षण देण्यात येत आहे. या नर्सरीत प्रवेशकरिता चंद्रपूर शहरातील 4 ते 10 वर्ष वयोगटातील सर्व मुला-मुलींनी 7038301764 या क्रमांकावर संपर्क साधावा.

तरी चंद्रपूर शहरातील सर्व शाळेतील जास्तीत जास्त खेळाडूंनी या प्रशिक्षण शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी अनंत बोबडे यांनी केले आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.