Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, एप्रिल ०१, २०१९

निवडणुकीतील तत्काळ माहितीसाठी एमसीएमसीचे व्टीटर हॅण्डल

बातम्या व माहितीसाठी@ChandrapurMcmc फॉलो करण्याचे आवाहन

चंद्रपूर/प्रतिनिधी:

 11 एप्रिल रोजी मतदान होणाऱ्या चंद्रपूर मतदारसंघातील लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात प्रशासनामार्फत गतिशील माहिती देण्यासाठी माध्यम प्रमाणीकरण व मॉनिटरिंग समिती अर्थात एमसीएमसी ( मीडिया सर्टिफिकेशन अँड मॉनिटरिंग कमिटी ) मार्फत अधिकृत व्टीटर हॅण्डल तयार करण्यात आले आहे.

जिल्‍हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी जिल्हा प्रशासनाच्यावतीने हे ट्विटर हँडल सुरू केले असून यावरून तातडीची माहिती जारी करण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे. जिल्ह्यातील पत्रकार व अन्य माध्यम प्रतिनिधींना देखील याचा लाभ घेता येणार आहे. माध्यम प्रमाणीकरण व मॉनिटरिंग समितीमार्फत या ट्विटर हँडलवर जिल्हा माहिती कार्यालय चंद्रपूर व माध्यम प्रमाणीकरण व सानियंत्रण समिती यांच्यामार्फत जारी करण्यात आलेले वृत्त ,छायाचित्र व अन्य आवश्यक माहिती वेळोवेळी देण्यात येणार आहे.

बातम्या व माहितीसाठी@ChandrapurMcmc फॉलो करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. माध्यम प्रतिनिधी व अन्य घटकांनी या ट्विटर हँडलला फॉलो करून माहिती उपलब्ध करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी केली आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.