Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, एप्रिल १०, २०१९

अनफोल्ड : ऑल-न्यू बीएमडब्ल्यू झेड४ रोडस्टारचे भारतात अनावरण


अनअडल्टरेटेड ड्रायव्हिंग प्लेझर ओपन-टॉप टू-सीटरसह आणि शुद्ध स्पोर्टिंगच्या रचनेसह.

  • इमोशन पॅक्ड बॉडी डिझाइन, इलेक्ट्रिकली पॉवर्ड सॉफ्ट टॉप रूफ, ड्रायव्हरसाठी आवश्यक अंतर्गत डिझाइन आणि शक्तिशाली ड्रायव्हिंग डायनॅमिक्स.

  • भारतात प्रथमच बीएमडब्ल्यू एम परफॉर्मन्स मॉडेल आणखी जास्त उत्तम परफॉर्मन्ससाठी.

१०  एप्रिल २०१९ : ऑल न्यू बीएमडब्ल्यू झेड४ रोडस्टरचे अनावरण भारतात करण्यात आले. आपले शक्तिशाली ड्रायव्हिंग डायनॅमिक्स आणि प्रोग्रेसिव्ह डिझाइनसह असलेली ऑल न्यू बीएमडब्ल्यू झेड४ रोडस्टर रस्ता आणि खुल्या आकाशादरम्यान स्वातंत्र्य देते.

ऑल न्यू बीएमडब्ल्यू झेड४ रोडस्टर भारतभरातील सर्व बीएमडब्ल्यू डीलरशिप्समध्ये कंप्लीटली बिल्ट अप (सीबीयू) मॉडेलच्या स्वरूपात उपलब्ध आहे.

डॉ. हान्स- ख्रिश्चन बार्टेल्स, प्रेसिडेंट  (act.)  बीएमडब्ल्यू ग्रुप इंडिया म्हणाले की “बीएमडब्ल्यू कडे अशा रोडस्टर्सचा एक समृद्ध वारसा आहे, जे शुद्ध ड्रायव्हिंग प्लेझरसाठी उभे राहिले आहेत. ऑल न्यू बीएमडब्ल्यू झेड४ रोडस्टर ही बीएमडब्ल्यू रोडस्टर्सना चालना देण्याच्या दीर्घकालीन इतिहासाचे प्रतीक आहे. वैविध्यपूर्ण रचना, भावनिक डिझाइन आणि रोमांचकारी स्पोर्टीनेस असलेल्या या ओपन टॉप टू सीटरमध्ये क्लासिक रोडस्टरला भविष्याच्या काळात नेण्यात येते. गाडीचे छत उघडते तेव्हा ड्रायव्हिंग प्लेझरला ऑल न्यू बीएमडब्ल्यू झेड४ रोडस्टरमध्ये मर्यादा राहत नाही.”

ऑल न्यू बीएमडब्ल्यू झेड४ रोडस्टर दोन इंजिन व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध आहे. बीएमडब्ल्यू झेड४ एसड्राइव२०आय  आणि बीएमडब्ल्यू एम परफॉर्मन्स मॉडेल, बीएमडब्ल्यू झेड४ एम४०आय. ऑल न्यू बीएमडब्ल्यू झेड४ एम४०आय हे अत्यंत स्पोर्टी मॉडेल असून रोडस्टरचे सौंदर्य आणि एम ऑटोमोबाइलचे एथलेटिझम एकत्र आणते. बीएमडब्ल्यू झेड४ एसड्राइव२०आय  ला काही आकर्षक टच देण्यासाठी स्पोर्ट लाइन किंवा एम स्पोर्ट पॅकेजचा वापर केला जाऊ शकतो. स्पोर्ट लाइन पॅकेज अधिक स्पोर्टी एपियरन्सद्वारे आकर्षित करते, तर एम मॉडेल गाडीला अधिक डायनॅमिक टच देते.

एक्स शोरूम किंमती खालीलप्रमाणे आहेत.
बीएमडब्ल्यू झेड४ एसड्राइव२०आय     :     64,90,000 रुपये
बीएमडब्ल्यू झेड४ एम४०आय : 78,90,000 रुपये

*बिल बनवताना लागू असलेली किंमत लागू होईल. एक्स शोरूम किंमती जीएसटी सह (नुकसानभरपाई सेस) सह लागू असल्याप्रमाणे आहेत, परंतु त्यातून रोड टॅक्स, टॅक्स कलेक्टेड एट सोर्स (टीसीएस), टॅक्स कलेक्टेड अॅट सोर्सवर जीएसटी, आरटीओ स्टॅटुटरी कर/ शुल्क, इतर स्थानिक कर उपकर भार आणि इन्शुरन्स यांना वगळण्यात आले आहे. किंमत आणि पर्याय कोणतीही पूर्वसूचना न देता बदलू शकतात. अधिक माहितीसाठी कृपया तुमच्या स्थानिक प्राधिकृत बीएमडब्ल्यू डीलरला भेटा.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.