Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, एप्रिल ०३, २०१९

मतदारांनी निवडणूकी संदर्भातील मदतीसाठी 1950

हेल्पलाईनचा वापर करावा : संजय डांगे

चंद्रपूर दि.3 एप्रिल : देशाच्या राष्ट्रीय महोत्सवात सर्व 18 वर्षावरील मतदार मतदान करण्यासाठी सज्ज आहे.आपले कर्तव्य आणि जबाबदारी पार पाडत या महोत्सवात सहभागी होतील.परंतू,अनेक मतदारांच्या मनामध्ये निवडणूकी संदर्भात सुचना व शंका असतात या सूचना व शंकेचे निरसन होण्यासाठी भारतीय निवडणू‍क आयोगाने 1950 ही 24 तास काम करणारी मोफत हेल्पलाईन सेवा मतदारांसाठी सुरू करण्यात आलेली आहे.या हेल्पलाईनचे कक्ष प्रत्येक जिल्ह्याच्या ‍जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी कार्यालयामध्ये आहे.

याच प्रकारचे 1950 मतदार मदत हेल्पलाईन सेवा कक्ष चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी  कार्यालय  मध्ये सुरू केलेले आहे.या मतदार मदत हेल्पलाईन अंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील विविध ठिकाणाहून मतदार निवडणूकी संदर्भात विविध सुचना तसेच विविध शंका विचारत आहे.

1950 मदत हेल्पलाईन नुसार चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त कॉल हे मतदान यादी मध्ये आपल्या नावाची खात्री करण्यासाठी आलेले आहे.त्याचप्रमाणे काही सुचना आणि तक्रारीचे पण कॉल आलेले आहे.सद्यस्थितीमध्ये 1962 कॉल आलेले आहे.या कॉलची संख्या प्रत्येक मिनिटांमध्ये वाढत असते.अशी माहिती या केंद्राचे सहाय्यक संजय डांगे यांनी दिली.

या हेल्पलाईन अंतर्गत 71 तक्रारी आलेल्या असून  तक्रारी ह्या संबंधित कार्यालयाला पाठविण्यात येतात आणि त्यांचे ताबडतोब निरसन करण्यात येते.या हेल्पलाईनची  चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वच भागात मोठ्या प्रमाणात प्रसिध्दी झाल्यामूळे ग्रामीण भागातूनही आपले नांव मतदार यादीमध्ये असण्याची  खात्री करण्यासाठी या हेल्पलाईनचा वापर करीत आहे तसेच हि हेल्पलाईन मराठी, हिंदी व इंग्रजी अशा तीनही भाषामधून माहिती देवू शकते .

मतदारांनी यासाठीही वापरा 1950 हेल्पलाईन

-         निवडणूक आणि मतदानासंबंधिची माहिती वेळोवेळी देण्यासाठी

-         मतदारांच्या तक्रारी व  विविध शंकाबाबत मार्गदर्शन करण्यासाठी

-         मतदान ओळखपत्रात बदल किंवा स्थलांतर झाले असल्यास  याबाबतही मार्गदर्शन

-         मतदान ओळखपत्र निगडीत सर्व माहिती उपलब्ध करुन देण्यासाठी

चंद्रपूर जिल्हामध्ये पारदर्शी मतदान होण्यासाठी या 1950 हेल्पलाईनचा 18 वर्षावरील सर्व मतदार महिला,वृध्द,दिव्यांग यांनी उपयोग करावा आणि निर्भिडपणे आणि पारदर्शी मतदान करण्याचे आवाहनही केले.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.