Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, मार्च ०२, २०१९

सरपंचांना जास्तीत जास्त अधिकार आणि प्रोत्साहन


सरपंचांच्या मागण्यांसंदर्भात शासन सकारात्मक -  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस



मुंबई, दि. २ : राज्यातील सरपंचांच्या विविध मागण्यांसंदर्भात शासन पूर्ण सकारात्मक आहे. राज्यातील ग्रामविकासाची चळवळ अधिक गतिमान होण्याच्या दृष्टीने सरपंचांना जास्तीत जास्त अधिकार आणि प्रोत्साहन देण्यात येईल. राज्यातील ग्रामपंचायती आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण आणि अधिक सक्षम बनविण्याच्या दृष्टीने शासनाची समिती गठीत करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले.

पंचायत राज विकास मंचच्या अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या शिष्टमंडळासमवेत आज सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, सरपंचांच्या मानधनवाढीच्या मागणीबाबत शासन सकारात्मक आहे. याबाबत ग्रामविकास आणि वित्त विभागाच्या सचिवांनी बैठक घ्यावी, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. नवी मुंबई येथे सरपंच भवन उभारण्याच्या दृष्टीने जागा निश्चित करण्यासंदर्भात सिडकोला सांगावे, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या. सरपंच भवनमध्ये सरपंचांना निवास व्यवस्थेसह प्रशिक्षण केंद्र, ग्रंथालय, कॉन्फरन्स हॉल अशा विविध सुविधा उपलब्ध करुन देण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.

शासनाच्या सर्व निर्णयांची सरपंचांना रोजच्या रोज माहिती मिळणे, सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य यांना अटल विमा योजनेचे लाभ मिळणे, सरपंचांना शासनाचे ओळखपत्र मिळणे, जिल्हा नियोजन समिती तसेच बाजार समित्यांमध्ये प्रतिनिधित्व अशा विविध मागण्यांसंदर्भात कार्यवाही करण्यात यावी, असे निर्देशही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. राज्यातील काही महिला सरपंचांची फसवणूक करुन धनादेशावर त्यांच्या बनावट सह्या घेतल्याची तक्रार यावेळी परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी केली. त्याची दखल घेत याप्रकरणी तातडीने कारवाई करावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी ग्रामविकास सचिवांना दिले.

परिषदेने केले मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन

राज्यातील ग्रामविकासाची चळवळ अधिक गतिमान करण्याच्या दृष्टीने विविध निर्णय घेतल्याबद्दल  अखिल भारतीय सरपंच परिषदेने यावेळी मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले. सरपंचांची थेट निवड, जलयुक्त शिवार अभिया

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.