मुंबई, २२ ऑगस्ट : पुरोगामी महाराष्ट्रात एका दलित बांधवाची अंतयात्रा गावकर्यांकडून रोखून धरली जात असताना राज्याचे गृहमंत्री झोपा काढत होते का? असा संतप्त सवाल बहुजन समाज पार्टीचे प्रदेशाध्यक्ष अँड.संदीप ताजने यांनी रविवारी उपस्थित करीत माळशिरस येथील घटनेचा निषेध वर्तवला. शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकाळात आज ही दलितांना मानसांसारखी वागणूक दिली जात नाही. फुले-शाहू-आंबेडकरांचा महाराष्ट्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कुठे नेवून ठेवला आहे? असा सवाल देखील त्यांनी यानिमित्ताने उपस्थित केला.
पुढे बोलतांना ते म्हणाले की, गावकर्यांकडून होणाऱ्या अन्यायाविरोधात आवाज उचलणाऱ्या एका दलिताची अत्यंयात्रा अडवण्याचे पाप पुरोगामी महाराष्ट्रात घडले आहेत. ही घटना फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांवर चालणाऱ्या महाराष्ट्राला लाज आणणारी आहे. माळशिरस तालुक्यातील माळेवाडी बोरगावात घडलेल्या घटनेत दोषी असलेल्या गावकऱ्यांवर तात्काळ कारवाई करीत पीडित साठे कुटुंबियांना सामाजिक न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी अँड.ताजने यांनी यानिमित्ताने केली आहे.
गावकऱ्यांच्या दादागिरीला न जुमानता त्यांच्याकडून होणाऱ्या अन्यायाविरोधात आवाज उचलणाऱ्या धनाजी अनंता साठे (वय ४८) यांचा मृत्यू झाला. साठे कुटुंबियांकडून त्यांचा मृतदेह स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी नेला जात असताना काही गावकऱ्यांनी अंत्ययात्रा अडवली. पोलिसांनी याप्रकरणी तेरा गावकऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पंरतु, आरोपींना कठोर शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी अँड.ताजने यांनी केली आहे.अन्यायाविरोधात आवाज उचलने गुन्हा आहे का? एका दलित बांधवांची रोखण्यात आलेली अंतयात्रा दलित विरोधी मानसिकतेनेग्रस्त तथाकथितांनी बौद्धिक कुवत उघडी पाडणारी आहे, असा घणाघात अँड.ताजने यांनी केला.