Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, मार्च १४, २०१९

साई सेवासंकल्प प्रतिष्ठानच्या वतिने महिला दिन साजरा

चंद्रपूर/प्रतिनिधी:

श्री. साई सेवासंकल्प प्रतिष्ठान च्या वतिने रविवार 10 मार्च ला निर्माण भवन, रामनगर चंद्रपूर येथे महिला दिन व प्रतिष्ठान चा पहिला वर्धापन दिन साजरा करण्यात आला. चंद्रपुरातील स्वकतृत्वाने सामर्थ्या पर्यंतचा यशस्वी प्रवास गाठनाऱ्या दहा कर्तृत्ववाण स्त्रीयांना "मानिनी " या पुरस्कराने सन्मानित करण्यात आले.

सदर कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणुन सौ अंजलीताई घोटेकरमहापौर, महानगर पालिका चंद्रपुर यांची उपस्थिती लाभली तर प्रमुख पाहुणे म्हणुन सौ. निताताई कोतंमवार, सौ. संध्याताई विरमलवार. सौ अनिता मडपुवार या लाभल्या. दीप प्रज्वलन करुन साईबाबा आणि सावित्रीबाई फुलेन्च्या प्रतिमेला मालार्पन करुन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. प्रतिष्ठान च्या कार्याविषयी प्रतिष्ठानच्या उपाध्यक्षा सौ ज्योती शनवारे यानी माहिती दिली तर प्रास्ताविक भाषण व प्रतिष्ठान ची कार्यप्रणाली महिलांचा प्रतिष्ठानमधील योगदान व 1 वर्षाचा यशस्वी प्रवासा बद्दल प्रतिष्ठान चे अध्यक्ष सचिनभाऊ गाटकीने यांनी माहिती दिली. 


महिला दिनाच्या विशेष विषयावर सर्व पाहुण्यांनी उत्साहाने प्रबोधन केल. सोबतच सर्वांनीच श्री साई सेवासंकल्प प्रतिष्ठानशी जुळन्याचा मानस व्यक्त केला आणि प्रतिष्ठान छ्या प्रत्येक सेवाकार्याला सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली. सेवा कार्याची दखल घेउन महापौर अंजलीताई घोटेकर यांनी 5000/- रुपयाची सेवानिधी देण्याचे जाहीर केले.
कार्यक्रमाला मिळालेल्या भरघोस यशाबद्दल प्रतिष्ठान सर्वांचे आभारी आहे.कार्यक्रमाचे संचालन वर्षा दळवे व आभार सौ ममता दादुरवाडे यांनी केले तर यशस्वीतेसाठी सुचीता कामतकर, आशा यादव , विद्या रणदिवे, पूनम नवले , प्रमिला चहारे , मालिन्दा निखाडे , सुनीता ईमले ,रिंकी कपूर , कमल येरगुडे , वनिता भोयर ,प्रतिभा गिरड्कर , सुषमा संतोषवार माया मुदगल , वंदना चन्ने, कुंदा लाड , सुनीता हेपट, चारूलता पेंढारकर, योजना मोदी , अनिता वाटेकर, छाया श्रीनिवास , नलिनी बेण्डेकर यांनी अथक परिश्रम घेतले

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.