Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, मार्च १४, २०१९

१९ मार्चला किसानपुत्रांचे अन्नत्याग आंदोलन

चंद्रपूर/(प्रतिनिधी): 

राज्यातील पहिल्या शेतकरी आत्महत्येच्या ३३ व्या स्मुतीदिनानिमित्य चंद्रपूर जिल्ह्यातील किसानपुत्र आणि पुत्री अन्नत्याग आंदोलन करून शेतकऱ्याप्रति सहवेदना व्यक्त करणार आहेत. या आंदोलनाचा समारोप १९ मार्च २०१९ रोजी सायंकाळी ४.०० ते ६.०० वाजता गांधी चौक, चंद्रपुर येथे होईल. 

यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हाण येथील शेतकरी साहेबराव करपे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी १९ मार्च १९८६ ला सामुहिक आत्महत्या केली. राज्यातील ही पहिली अधिकृत शेतकरी आत्महत्या. त्यानंतर आजतागायत लाखो शेतकऱ्यानी गळफास लावून घेतला. शेतकऱ्याच्या आत्महत्या वाढत आहेत. धोरणकर्ते शेतकऱ्याचे ऐकत नाही. त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या पाठीशी शेतकरीपुत्र आणि पुत्रींना उभे रहावे लागणार आहे. त्याअनुषंगाने अन्नत्याग आंदोलनाचे आयोजन करण्यात आले. या आंदोलनात प्रत्यक्ष सहभागी होण्याची गरज नाही. ज्या ठिकाणी तुम्ही कामावर असाल. तिथे दिवसभर उपवास करून आंदोलनात सहभागी होऊ शकता. या आंदोलनाची सांगता १९ मार्च २०१९ रोजी सायंकाळी ४.०० ते ६.०० वाजता गांधी चौक, चंद्रपुर येथे होईल. 

यावेळी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना आदरांजली आणि त्याच्याप्रति सहवेदना व्यक्त केल्या जाईल. 
गतवर्षी राज्यभरात अन्नत्याग आंदोलन झाले होते. वेगवेगळ्या क्षेत्रांतील किसानपुत्र आणि पुत्री या अन्नत्याग आंदोलनात हजारोंच्या संख्येने सहभागी झाल्या. 

यावर्षीही राज्यभरात अन्नत्याग आंदोलन होणार आहे. यात सर्वपक्षीय नेते, विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी सहभागी व्हावे आणि शेतकऱ्याप्रति संवेदना व्यक्त करावी, असे आवाहन किसानपुत्र फाउंडेशन, भूमिपुत्र युवा एकता बहु. संस्था, मनोवेध सांस्कृतिक प्रतिष्ठान, जनसेवा विकास सेना , युथ चांदा ब्रिगेड, इको प्रो, मराठा सेवा संघ, स्वाभिमानी कुणबी संघटना, धर्मराज्य पक्ष, ग्रीन प्लॅनेट सोसायटी, सावित्रीबाई फुले ज्ञानदीप बहुउद्देशीय संस्था, युथ ऑफ चांदा आणि चंद्रपूर बचाव संघर्ष समितीने केले आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.