Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, मार्च १५, २०१९

वंचित व दुर्बल घटकातील पाल्यांना विनाशुल्क इंग्रजी शाळेमध्ये प्रवेश




प्रशांत गेडाम/सिंदेवाही-
  बालकाचे मोफत व सक्तीचे शिक्षण अधिनियमानुसार वंचित व दुर्बल घटकातील पालकांच्या मुलांना ईग्रजी माध्यमाचा पूर्व प्राथमिक व प्राथमिक शाळेत आरक्षित असलेले  25 टक्के प्रवेश  ऑनलाइन प्रक्रियेसाठी  अर्ज भरण्यास   5  मार्च पासून सुरू झाले असून. तारीख अंतीम  22 मार्च पर्यंत आले भरता येनारआहे . सिंदेवाही तालुक्यातील पाच शाळा असून शहरातील 4 व नवरगाव मधील (1) शाळेचा समावेश आहे .त्यामध्ये  देवयानी इंटरनॅशनल स्कूल  सिंदेवाही, कल्पतरू विद्यामंदिर शाळा सिंदेवाही ,  यशराज काँन्वेट सिंदेवाही, प्राजक्ता  विद्यामंदिर काँन्वेट सिंदेवाही, कल्पतरू काँन्वेट  नवरगाव  ता.सिंदेवाही ,या शाळा प्राथमिक वर्ग प्राथमिक वर्ग 25 टक्के प्रवेश प्रक्रिया उपलब्ध राहणार आहे .त्यामध्ये शिक्षण हक्क कायद्यानुसार आर्थिक दुर्बल घटकातील बालकांसाठी इयत्ता पहिलीमध्ये २५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. आरटीईची ही प्रवेश प्रक्रिया नवीन सत्रातील शाळा सुरू होण्यापूर्वी पूर्ण होते. त्यामध्ये  (उत्पन्नाचा दाखला) आवश्यक आहे. एक लाख  रुपयापेक्षा कमी असणारे . प्रवेशासाठी आवश्‍यक असलेली माहिती कोणत्याही ऑनलाईन नेट , सायबर कॅफे मधून भरता येणार आहे.
 आरटीई अंतर्गत २५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रियेसाठी शााळांचा निरूत्साह दिसून येत आहे.   काही शाळांच्या गेट समोर शिक्षण विभागाने  आरटीई अंतर्गत २५ टक्के मोफत प्रवेश दिला जाईल व त्यासाठी कागदपत्र हे लागतील.असा प्रसिद्धी पत्रक लावायला सांगितले होते पण काही शांळानी लावले .काही शांळानी लावले नाहीत. ५ मार्चपासून पालकांसाठी आॅनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होत असून ही प्रवेश प्रक्रिया लांबल्याने प्रवेश घेण्याच्या कालावधीत अर्ज भरण्याची वेळ पालकांवर आली आहे.  
शिक्षण हक्क कायद्यानुसार आर्थिक दुर्बल घटकातील बालकांसाठी इयत्ता पहिलीमध्ये २५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते.परंतु आरटीईची ही प्रवेश प्रक्रिया नवीन सत्रातील शाळा सुरू होण्यापूर्वी पूर्ण होणे आवश्यक आहे. त्यासाठी जानेवारी अखेरपर्यंत शांळा नोंदणी व फेब्रुवारीच्या दुसया आठवड्यामध्ये पालकांना अर्ज भरण्याची प्रक्रिया राबविणे महत्त्वाचे असते; परंतू २०१९-२० या शैक्षणिक वर्षातील २५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रिया एक महिना उशीराने सुरू असल्याचे दिसून येत आहे.
सिंदेवाही तालुका 
आरटीई अंतर्गत प्रवेश प्रक्रिया राबविण्यासाठी शाळांमध्ये कमालीची उदासीनता पाहावयास मिळत आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.