Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, मार्च १५, २०१९

पीककर्जावर 6% दराने व्याज वसूली

मूल/प्रतिनिधी 

 शेतकऱ्यांसाठी बिनव्याजी पीककर्जाची सोय असतांना चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने 2018-19 मध्ये शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी दिलेल्या पीककर्जावर 6% दराने व्याज वसूल करण्याचे आदेश आपल्या सर्व शाखां दिले आहे. बँकेने अचानकपणे घेतलेल्या या पावित्र्यामुळे शेतकरीवर्ग पार गोंधळून गेले असून संताप व्यक्त करीत आहे.

 शेती हंगाम निराशाजनक असतांना उचल केलेली पीककर्जाची रक्कम 31 मार्चपूर्वी भरण्यासाठी रकमेची जसेतसे जुळवाजुळव करणाऱ्या शेतकऱ्यांपुढे व्याजाचा रकमेची समस्या निर्माण झाली आहे. महत्त्वाचे म्हणजे लगतचा गडचिरोली जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचे  व्याज वसूल करण्यात येत नसल्याचे सांगण्यात येत आहे. शेतीसाठी बि-बियाणे,खते आणि ईतर आनुषंगिक कामांसाठी शेतकऱ्यांना 1 लाखापर्यंतचे  बिनव्याजी कर्जाची सोय उपलब्ध करून देण्याचे शासनाचे आदेश आहेत. राज्यातील जिल्हा सहकारी बँका आणि ईतर सर्व राष्ट्रीयकृत बँकां शासन आदेशाचे पालन करीत आहे. यावर्षी मात्र चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने 1 लाखापर्यंतचा पीक कर्जावर 6% दराने आणि 1 लाखापेक्षा जास्त मात्र 3 लाखापर्यंतचा पीक कर्जावर 8% दराने व्याज वसूल करण्याचे 4 डिसेंबर 2018 च्या परिपत्रकाद्वारे आपल्या सर्व शाखाप्रमुखांना आदेश दिले आहे. जिल्हा सहकारी बँकेने काढलेल्या परिपत्रकात राष्ट्रीय बँकेचे,नाबार्ड आणि सहकार आयुक्तालयांचा पत्रांचा संदर्भ दिलेले आहे. जिल्हा सहकारी बँकेकडून शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या बिनव्याजी कर्जावरील व्याज शासन बँकांना देत असते. परंतु 2018-19 चा हंगामासाठी शेतकऱ्यांना दिलेल्या पीक कर्जाचे व्याज शासन शेतकऱ्यांच्या बचत खात्यात डी बी टी प्रणालीद्वारे जमा करणार असल्याचे बँकेचा परिपत्रकात सांगण्यात आले आहे. जिल्हा सहकारी बँक शेतकऱ्यांकडून वसूल करीत असलेली व्याज शासन शेतकऱ्यांच्या बचत खात्यात जमा करेल तेव्हा करेल परंतु आता मात्र शेतकऱ्यांना पीककर्जाच्या मुद्दल रकमेसह व्याजाचा रकमेची जुळवाजुळव करावी लागत आहे.     



शासनाचा परीपत्रकाप्रमाणे 
कार्यवाही- मनोहर पाऊणकर  
शासन आणि नाबार्डच्या परिपत्रकाप्रमाणेच 2018-19 साठीचा पीककर्जावर शेतकऱ्यांकडून व्याज वसूल करण्यात येत असल्याचे चंद्रपूर  जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनोहर पाऊणकर यांनी प्रतिक्रिया दिली.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.