समुद्रपूर/ प्रतिनिधी
मराठीचे शिलेदार बहुउद्देशीय संस्था, नागपूर तर्फे मराठी भाषा गौरव दिन विशेषांक व आम्ही काव्यस्तंभ प्रातिनिधिक कविता संग्रहाचे प्रकाशन दि १४ मार्च २०१९ रोजी श्री समर्थ गजानन महाराज संस्थान सभागृह, शेडगाव, ता. समुद्रपूर जि. वर्धा येथे संपन्न झाले.
या लोकार्पण सोहळ्यास अध्यक्ष प्रा. मेघशाम ढाकरे, विद्या विकास विद्यालय समुद्रपूर ता. प्रतिनिधी दै. देशोन्नती, प्रमुख पाहुणे अजय गावंडे प्राथमिक शिक्षक नेतृत्व, ज्येष्ठ शिक्षिका छाया कुबडे, सुधीर खडसे ता.प्रतिनिधी दै लोकमत, मार्गदर्शक संस्थापक अध्यक्ष राहुल पाटील, मराठीचे शिलेदार बहुउद्देशीय संस्था नागपूर प्रामुख्याने उपस्थित होते.
संस्थापक राहुल पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकात मराठी भाषा सक्षमीकरणासाठी संस्थेचे व समूहाचे कार्य तसेच विशेषांक व प्रातिनिधिक काव्यसंग्रह निर्मितीमागचा उद्देश स्पष्ट केला. अजय गावंडे यांनी सर्व उपक्रमशील शिक्षकांनी दर्जेदार लिखाण करण्याचे याप्रसंगी आवाहन केले. तर अध्यक्षीय भाषणात प्रा. मेघशाम ढाकरे यांनी मायबोली उदास झाल्याची खंत व्यक्त करत मराठी भाषेच्या सक्षमीकरण व संवर्धनासाठी मराठीचे शिलेदार संस्थेचे अभिनंदन करून या स्तुत्य उपक्रमास शुभेच्छा दिल्यात.
या लोकार्पण सोहळ्याचे सूत्र संचालन सूरज वैद्य यांनी केले तर आभार विशाल केदार यांनी मानले. याप्रसंगी समुद्रपूर तालुक्यातील बहुसंख्य शिक्षक, शिक्षिका व साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.