Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, मार्च १५, २०१९

अग्निशमन दलाच्या जवानाला मारहाण; शांततेच्या मार्गाने निषेध

दत्ताञय फडतरे/पुणे

विश्रांतवाडी हद्दीमध्ये मंगळवारी रात्री येरवडा अग्निशमन केंद्रातील जवान कचऱ्याला लागलेली अाग विझवायला गेले असताना तिथे असलेल्या दोघांनी सरकारी कामात अडथळा आणत आग विझवण्यास मज्जाव केला. दलाचे तांडेल या पदावर असलेले राष्ट्रपती शौर्य पदकाने सन्मानित सुनिल देवकर यांना शिविगाळ व मारहाण केली होती.

सदर प्रकरणी विश्रांतवाडी येथे पोलिसांकडे देवकर यांनी तक्रार दाखल केली. पण तक्रार दाखल होऊन ही गुरुवारी दुपारपर्यंत संबंधित दोषींना अटक झाली नसल्याचे पोलिसांकडून समजले.


याच घटनेचा निषेध म्हणून आज(गुरुवार) पुणे महानगरपालिका कामगार युनियन(मान्यताप्राप्त) चे अध्यक्ष व पदाधिकारी, अग्निशमन प्रमुख आणि जवानांनी एकजूट करत शांततेच्या मार्गाने संबंधित घटनेबाबत महापालिका भवन येथे दुपारी निषेध नोंदविला. तसेच मा.महापालिका आयुक्त यांची भेट घेऊन दोषींना तातडीने अटक करण्याची मागणी ही केली. तसेच जवानांच्या इतर ही समस्या सांगितल्या. मा.आयुक्त यांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी याबाबत दुरध्वनीवरुन चर्चा करुन प्रस्तुत प्रकरणी कारवाईबाबत सुचित केले. तसेच जवानांच्या इतर समस्यांबाबत लवकरच एक बैठक घेऊन तोडगा काढण्याबाबत आश्वासित केले.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.