Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, मार्च २८, २०१९

८६ टक्के वीज ग्राहकांची मोबाईल नोंदणी

चंद्रपूर/प्रतिनिधी:
mobile registration साठी इमेज परिणाम
 महावितरणच्या मोबाईल अ‍ॅप्सचा राज्यातील ग्राहकांना मोठा लाभ मिळत असून महावितरणच्या कामकाजातही गतीशीलता व पारदर्शकता आली आहे. महावितरणच्या वतीने तयार करण्यात आलेल्या मोबाईल अ‍ॅप्समुळे राज्यातील ग्राहकांना तत्पर व ऑनलाईन सेवा मिळत आहे. तसेच महावितरणचे कर्मचारी मोबाईल अ‍ॅप्सद्वारे विविध दैनंदिन कामे ऑनलाईन करीत असल्यामुळे महावितरणच्या कामकाजात गतीशीलता व पारदर्शकता आली आहे.

चंद्रपूर परिमंडळांतर्गत येणाऱ्या चंद्रपूर व गडचिरोली मंडलातील एकंदरीत सहा लाख ३२ हजार ४५५ विविध वर्गवारीतील ग्राहकांनी मोबाईल क्रमांकाची नोंदणी केली आहे.
चंद्रपूर मंडलातील तीन लाख ६९ हजार ७७१ ग्राहकांनी मोबाईल क्रमांकांची नंोदणी केली आहे. तसेच, गडचिरोली मंडलातील दोन लाख ६२ हजार ६८९ ग्राहकांनी मोबाइल क्रमांकांची नंोदणी केली आहे.
महावितरणच्या ग्राहकांना मीटररिडींग, वीजबील, आॅनलाईन बील, नवीन वीजजोडणीसाठी अर्ज व त्याची सद्यस्थिती, मीटर वाचन घेतल्याचा आणि देखभाल व दुरुस्तीच्या कामासाठी वीजपुरवठा बंद करणे इत्यादीबाबतच्या सूचना महावितरणतर्फे एसएमएसद्वारे पाठविण्यात येत आहेत. या सर्व सेवा ग्राहकांना देण्यासाठी मोबाईल क्रमांकांची नोंदणी करणे आवश्यक आहे.

सद्यपरिस्थितीत चंद्रपूर मंडलातील ८७.३९ टक्के तर गडचिरोली मंडलातील ८५.९१ टक्के ग्राहकांनी नोंदणी केली आहे. उर्वरित १४ टक्के ग्राहकांनी नोंदणी केल्यास त्यांनाही या सुविधा एसएमएसद्वारा प्राप्त होणार आहे.
आपल्या भागातील रोहित्रात बिघाड झाला असेल किंवा दुरूस्ती कामासाठी वीजपुरवठा ख्ांडित करावयाचा असल्यास त्याबाबत माहिती ही एसएमएसने महावितरणद्वारे देण्याची सुविधा प्राप्त करण्यासाठी ग्राहकांना महावितरणच्या टोल फ्रीक्रमांकावर फोन करून नोंदनी करावी लागेल.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.