चिमूर/रोहित रामटेके
चिमूर:- चिमूर - वरोरा रोडवर असलेले आठवले समाजकार्य महाविद्यालय चिमूर (शेडेगाव कॅम्पस) येथे आज दि. ८/०३/२०१९ ला जागतिक महिला दिन साजरा करीत असताना महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ शुभांगी वडस्कर विद्यार्थाना मार्गदर्शन करीत असताना बोलल्या ज्या प्रमाणे बैलबंडीला दोन चाके असतात त्या प्रमाणे कुटुंबामध्ये सुद्या दोन चाक आहेत म्हणूनच जोतिबांनी सावित्रीनां घडवले त्याच प्रमाणे जर देशातील पुरुष स्त्रियांच्या सोबत असले तर त्यांच्या वरील अन्याय हा दूर होऊ शकतो.
कार्यक्रमाला पी.एस.आय. गणेश इंगोले पोलीस स्टेशन चिमूर हे प्रमुख उपस्थितीत उपस्थित होते. तर त्यांच्या सहकार्यात गीता उमरे या सुद्धा उपस्थित होत्या तर मुख्य मार्गदर्शक म्हणून प्रा. संजय पिठाडे सर उपस्थित होते.
प्रमुख उपस्थिती च्या मार्गदर्शनातुन बोलताना पी.एस.आय.इंगोले बोलले कि भारत देशापेक्षा जगाच्या पाठीवर विकसित देशामध्ये आज मातृसत्ताक कुटुंब पद्धती आहेत तसेच आपल्या भारतात विचार केला असल्यास केरळ या भागात सुद्धा मातृसत्ताक कुटुंब दिसतात पण आपलेच काही लोक हे स्त्रियांना निम्मं दर्जा देत असतात असे मार्गदर्शन त्यांनी विद्यार्थाना केले. गीता उमरे यांनी सर्व विद्यार्थाना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिला तर मुख्य मार्गदर्शक म्हणून प्रा. पिठाडे सर बोलताना म्हटले की, १९५०च्या आदीच्या स्त्रिया ह्या गुलामगिरीत जगत होत्या, प्रत्येकच धर्माचा विचार केला तर त्या धर्माचे धर्मगुरू हे पुरुषच होते त्यामुळे प्रत्येक धर्मात स्त्रियांची अवहेलना केल्या जात होती.पण १९५०च्या च्या नंतर भारताची राज्यघटना डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्त्रियांना जो घटनेत समान अधिकार दिला त्या अधिकाराने आजच्या स्त्रिया ह्या सक्षम आहेत त्यांच्या सोबत कायदा आहे. तसेच पुढे बोलताना पुरुषांनी स्त्रियांनां समजून घेणे व स्त्रियांनी पुरुषाला समजणे हे गरजेचे आहे कारण एकमेकांना सोबत घेतल्याने अनेक अत्याचार कमी होतात असे मार्गदर्शन प्रा. पिठाडे सर यांनी केले.
कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता प्रा. मिलमिले सर, प्रा. रेवतकर सर, ग्रंथमित्र शेषकर सर,वरिष्ठ लिपिक मेश्राम सर व सर्व आठवले समाजकार्य महाविद्यालयाचे शिक्षकवृंद आणि शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. वीणा काकडे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. रागिणी मोठघरे यांनी केले.