वाडी ( नागपूर )/अरूण कराळे:
वाडी शहरात गेल्या काही महिन्यापासून सतत घरफोड्या, चोर्या आणि लुटमारीचे प्रकार वाढत असुन स्थानीक नागरिक भयभीत झाले आहेत.कोहळे -लेआऊट,दत्तवाडी,हरीओम सोसायटी मधील मंदीरातील दानपेटी फोडण्याचे प्रमाण वाढले आहे .
शाळा , महाविद्यालय तसेच शिकवणी वर्गासमोर मुलींचे छेडखानीचे गैरप्रकार वाढले असून मुलींना जाता येता असामाजिक तत्वाचा त्रास होत आहे . या प्रकारामुळे मुली भयभीत झाल्या आहेत.वाडीतील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी शहरातील मुख्य ठिकाणी व संवेदनशील भागात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावी तसेच पोलिसांची गस्त वाढवावी अशा आशयाचे निवेदन युवासेना जिल्हाप्रमुख हर्षल काकडे यांच्या मार्गदर्शनात वाडीचे सचिव सचिन बोंबले यांच्या नेतृत्वात वाडी नगर परिषदचे उपमुख्याधिकारी आकाश सहारे व वाडी पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाठक यांना देण्यात आले.
जर या विषयावर आठ दिवसांत अंमलबजावणी झाली नाही तर शिवसेना, युवा सेनेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला .यावेळी युवासेनेचे संघटक प्रमुख प्रीतम नेवारे , प्रमोद पडोळे ,अक्षय चावके,विक्की देवरे,शुभम सुर्यवंशी, अनिकेत गाढवे ,शशांक मिश्रा, प्रविण गडमले,तोषित आंबाडकर, शांतनु काळे, श्रेयश पडोळे,प्रज्वल अतकरी, वैभव राजे ,विनय वाड प्रामुख्याने उपस्थित होते .