Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, मार्च ०९, २०१९

राजाचे कुर्लेतील एकटया सायकलस्वारांचा २१० किलोमीटरचा प्रवास

व्यसन मुक्त युवक हाच खरा समाज सुधारक हा समाजाला दिला संदेश 

पुसेसावळी/प्रतिनिधी:

 खटाव तालुक्यातील राजाचे कुर्ले गावचे रहिवासी असलेले युवकमित्र रमेश माने हे ह.भ.प.बंडा महाराज कराडकर संस्थापक असलेल्या व्यसन मुक्त युवक महाराष्ट्र राज्य संघटनेचे कार्यकर्ता म्हणून काम करत आहेत तरी या संघटनेच्या माध्यामातून गेली सतरा वर्षे समाजातील युवकांनी व्यसनापासून लांब रहावे म्हणून विविध उपक्रम राबवत अाहेत 

त्याचाच एक भाग म्हणून श्री क्षेत्र देहु (पुणे) ते श्री क्षेत्र गिरिजा शंकरवाडी (राजाचे कुर्ले) अशी २१० किलोमीटरच्या सायकल फेरीमध्ये "व्यसन मुक्त युवक हाच खरा समाज सुधारक" व "सायकल चालवा पर्यावरण वाचवा" असा संदेश या प्रवासात दिला, तरी प्रवासादरम्यान विविध ठिकाणी भेटलेल्या युवकांना मार्गदर्शन करुन आपण आपला सर्वात जवळचा मित्र हे अापले शरीर असुन ते जर व्यसनापासून दुर ठेवले तर कोणतेही उद्देश गाठु शकतो, याबाबत एक संदेश देऊन युवकांना व्यसनापासुन दुर करण्याचे काम यातुन केल्याचा आनंद मिळतो त्याचबरोबर प्रवासावेळी अनेक ठिकाणी स्वागत करण्यात आले.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.