Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, मार्च ०९, २०१९

वाडीतील डॉ .आंबेडकर नगरात पाणी पेटले

डॉ .आंबेडकर नगरच्या रस्त्यावर पाण्याच्या ड्रमाचे प्रदर्शन
मजीप्राच्या पाण्यापासून नागरीक वंचित
वाडी ( नागपूर ) / अरुण कराळे:

गेल्या अनेक दिवसांपासून डॉ . बाबासाहेब आंबेडकर नगरमधील वार्ड क्रमांक ५मध्ये भीषण पाण्याची टंचाई असल्याने नागरीकांमध्ये रोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.वाडी नगर परिषद मधून आठ दिवसातून फक्त एकदाच टँकर ने पाण्याचे पुरवठा करीत आहे.तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वेणा जलाश्यातून दोन महिन्यापासून नागरीक पाणी पुरवठापासून वंचित आहे.नगरातील प्रत्येक कानाकोपऱ्यात पाण्याच्या ड्रमची रांग लागलेली आहे.

पिण्याच्या पाण्यासाठी नागरीकांना सतत दारोदार फिरावे लागत आहे.दूषित पाणी पिल्याने नागरीकांना पिलीयाचा देखील सामना करावा लागत आहे.डॉ.आंबेडकर नगर मध्ये ५ वार्ड असून २२ हजार नागरीकांची वस्ती आहे .मजीप्राच्या वेणा जलाशयातून फक्त १० ते १५ मिनीट पाणी पुरवठा होत होता आता तर दोन महिन्यापासून नागरीक पाण्यापासून वंचित आहे.त्यामुळे नगर परिषदने टॅकरच्या साहाय्याने पाणी पुरवठा सूरू केले आहे .

नगर परिषद तर्फे दररोज ३० ते ३५ टँकर नगरात पोहोचवित असल्याची माहिती अभियंता अवि चौधरी यांनी दिली आहे.भविष्यात वाडी शहराला पाण्याची समस्या सोडविण्यासाठी नगर परिषद तर्फे एक विहीर ,९१ बोरवेलचा प्रस्ताव शासनाला सादर केला आहे. काही दिवसांनंतर वाडीतील पाण्याची समस्या भिषण होणार आहे . पाण्याच्या टंचाई बाबत कॉग्रेस व राष्ट्रवादी कॉग्रेसनी मोठ्या प्रमाणात आंदोलन सुद्धा भव्य केले आहे .

  डॉ .आंबेडकर नगराच्या रस्त्यावर पाण्यच्या ड्रमचे प्रदर्शन एक महिन्यापासून आंबेडकर नगरच्या नागरीकांनी पाण्यासाठी रस्त्यावर घराच्या सामोर पाण्याचे ड्रम उभे केले आहे.रस्त्यावर ड्रमचे स्पर्धात्मक प्रदर्शन सारखे दिसल्याने पाणी पेटल्याचे संकेत दिसून येत आहे. टँकरच्या कर्मचाऱ्यांच्या सांगितल्या प्रमाणे रात्रीच्या १२ वाजतापर्यंत पाण्याच्या टँकरच्या साहाय्याने पाणी पुरवठा करण्यात येत आहे .

॥नागरीकात थोडेफार दिसत आहे समाधान॥ 
डॉ .आंबेडकर नगरात दररोज नगर परीषद आधी २५ टँकर देत होते आता तर ३५ टँकरद्वारे पाण्याच्या पूरवठा सुरू आहे . त्यामुळे अंदाजे ४ लाख लीटर पाणी डॉ .आंबेडकर नगरच्या वेगवेगळ्या वार्डात पाणी पुरवठा होत आहे.१२ हजार लीटर पाण्यासाठी तेराशे रुपये प्रती टँकरद्वारे न.प ला रक्कम भरावी लागत आहे.ज्यात माहिन्याचे १० लाख रुपयापेक्षा अधिक रक्कम नगर परिषदला भरावे लागते .नगरात रोज ६० टँकर म्हणजे ७ लक्ष लीटर पाण्याची आवश्यकता आहे. नागरीकांनी ड्रम सुध्दा किरायांनी आणले असून त्यामुळे त्यांच्याही खर्चात वाढ झाली आहे . डॉ .आंबेडकर नगरातील रहिवासीयांची आर्थीक परीस्थिती कमजोर . असून त्यांना सुद्धा आरओचे पाणी विकत घ्यावे लागत आहे.

डॉ .आंबेडकर नगरमध्ये एकूण १४ बोरवेल आहेत. त्यामध्ये फक्त ५ बोरवेल सूरू आहे. नगरात एक विहीर आहे परंतु ती विहीर स्वच्छ नसल्यामुळे नागरीक त्यामधील पाणी वापरत नाही .विहीर स्वच्छ केली असती तर त्यातले पाणी नागरीकांनी वापरले असते . संपूर्ण वाडी शहरात २२ सार्वजनीक विहीर पैकी १४ विहीर उपयोगात आहे. १४ विहिरीच्या माध्यमातून काही वार्डामध्ये उपयोग होत आहे .पाण्यातील समस्या पाहून १३ विहिरी स्वच्छ केल्या जातील. त्यामध्ये मारोती नगर ,सदाचार सोसायटी , स्मृति नगर,म्हाडा कॉलनी,नवनीत नगर, रमाबाई नगरचा समावेश आहे.

वाडीत एकूण १२६ बोरवेल
शहरात एकूण १२६ बोरवेल पैकी ११६ बोरवेल सूरू आहे . दररोज वाडीत तीस लाख लिटर पाण्याची आवश्यकता असून तसा प्रस्ताव पाठविला आहे .वेणा जलाशयात फक्त पाच टक्के पाणी शिल्लक आहे.डॉ.आंबेडकर नगर येथे तीस ते पस्तीस टँकर दररोज पाठवित आहे तर इतर काही भागात पंधरा टँकर पाठविल्या जात आहे. ९१ बोरवेलचे प्रस्ताव तयार केले असून पस्तीस बोरवेल लगेच करण्यात येईल . पाण्याची समस्या मार्गी लागण्याकरिता नगरपरिषद प्रयत्नरत आहे. नागरिकांनी पाणी जपूण वापरा असाही संदेश पाणी पुरवठा सभापती नीता अभय कुणावार यांनी दिला

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.