खडगांवात शक्ती स्थल मानव मंदिराचे उदघाटन
नागपूर / अरुण कराळे:
मानवधर्म हा निःशुल्क,निःस्वार्थ भावनेचा मार्ग आहे,म्हणून सेवकांनी सत्यापरी जागृत राहून निष्काम सेवा करावी .महान त्यागी बाबा जुमदेवजीने भगवंताची प्राप्ती करून गोर-गरिबांची दुःखातून मुक्ती केली .आपला समाज आजही विविध व्यसनाने जखडला आहे .समाजात अजूनही जुन्या चालीरीती,अंधश्रद्धा आहेत त्यासाठी बाबांनी सांगितलेले चार तत्व, तीन शब्द व पाच नियम अंगीकृत करून दुःखी-कष्टी लोकांची सेवा करत दुष्ट चालीरीतीचा नायनाट करण्याची जबाबदारी आपणावर आहे,ती आपण समर्थपणे सांभाळून बाबाच्या मानवधर्माची कल्पना साकारावी'असे आव्हान यावेळी माजी मंत्री राजेंद्र मुळक यांनी सेवकांना केले.
रुद्र अवतार भगवान बाबा हनुमानजी सेवक बहुउद्देशीय संस्था वाडी द्वारा निर्मित खडगांव स्थित हनुमान मंदिर परिसरात शक्तीस्थल व मानव मंदिराचे उदघाटन जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक,तिरनजी टेंभरे,उमनबाई टेंभरे यांचे हस्ते माजी जि प अध्यक्षा संध्या गोतमारे,सदस्या कुंदाताई राऊत,जि. प . सदस्या प्रणिता कडू,लिखिराम सोनवाने,पर्यटक मित्र चंद्रपाल चौकसे,संस्थेचे अध्यक्ष गिरीधर बरगे,रघुपती फंदे, भीमराव कडू, माजी सरपंच देवराव कडू,उपसरपंच किशोर सरोदे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. कार्यक्रमाअंतर्गत हवन,भव्य शोभायात्रा व चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले .
यावेळी आयोजक केशव मुळे, रावजी भोदंले,चिंधु खाटीक,शैलेश सेलोकर,धीरज रेवतकर,उत्तम वैवटकर,सुखदेव लुंगे,शंकर भोयर,प्रकाश सोनवणे,छबिलाल डोहळे प्रामुख्याने उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वीतेसाठी गणेश बरगे,गिरीधर वाघमारे,संतोष कवरे, गणेश महाजन,पंढरी भानुसे, विष्णू शेंडे,राजू सोनवणे,दिलीप रेवतकर,प्रकाश टिचुकले, राजू सावरबांधे आदीनी सहकार्य केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य आयोजक गिरीधर बरगे,संचालन रामदास मथुरे,आभार प्रदर्शन जयराम महाजन यांनी केले.