आयुष्यमान भारत योजनेमध्ये आरोग्यवर्धिनी केंद्रासाठी नियुक्त करण्यात आलेल्या कम्युनिटी हेल्थ
ऑफिसर पदासाठी एक्झिट परीक्षा रद्द करण्याची मागणी
(राजु पिसाळ ) कराड:पुसेसावळी : बी.ए.एम.एस ही वैद्यकिय क्षेत्रातील पदवी पुर्ण करुन एक वर्षाची आंतरवासिता पूर्ण केलेल्या व सध्या आरोग्यवर्धिनी योजनेसाठी प्रशिक्षण घेत असलेल्या प्रशिक्षणार्थी डाॅक्टरवर राज्य शासनाने एक्झिट परीक्षा लागू केली आहे.त्यासाठी परीक्षा फी हजारो रुपयांच्या घरात आहे.सदरची एक्झिट परीक्षा रद्द व्हावी अशी राज्यभरातील प्रशिक्षणार्थींकडून मागणी होत आहे.सदरची परीक्षा ही अन्यायकारक व पदवीच्या विश्वासाहर्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे असे प्रशिक्षणार्थ्यांचे म्हणणे आहे.
राज्य शासनाने सदरची परीक्षा रद्द करण्याची मागणी राज्यातील प्रशिक्षणार्थ्यांच्यातून जोर धरु लागली आहे.त्यासाठी प्रशिक्षणार्थी आरोग्य अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे आपले म्हणणे मांडत आहेत.
आयुष्यमान भारत योजनेमध्ये आरोग्यवर्धिनी केंद्रासाठी नियुक्त करण्यात आलेल्या कम्युनिटी हेल्थ आॅफिसर(समुदायिक आरोग्य अधिकारी) पदासाठी एक्झिट परीक्षा होणार आहे.या पदासाठी प्रशिक्षणापुर्वी गुणानुक्रमे प्रशिक्षणा र्थ्यांची निवड करण्यात आली.त्यानंतर त्यांना सहा महिने प्रशिक्षण देण्यास सुरुवात झाली. त्यानंतर एक्झिट परीक्षा उत्तीर्ण होणे बंधन कारक करण्यात आले आहे.या परीक्षेला प्रशिक्षणार्थ्यांचा विरोध आहे.सदर प्रशिक्षण व बी.ए.एम.एस पदवीचा अभ्यासक्रम सारखाच आहे.असे असताना आरोग्यवर्धिनी केंद्रामध्ये रुजू होण्यास वेगळी परीक्षा का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
सदरची योजना महाराष्ट्र राज्यातील चार जिल्ह्यात 2017 मध्ये राबविण्यात आली. सप्टेंबर 2018 ला दिनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्ताने संपुर्ण देशात ही योजना राबविण्यास सुरवात केली अाहे.26 जानेवारी 2019 नंतर काही आरोग्य केंद्रांचे लोकार्पण देखील झाले आहे.या योजनेत प्रशिक्षण घेतलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना एक्झिट परीक्षा न घेता सरळ सेवेत रुजू करुन घेण्याची राज्यभरातील प्रशिक्षणार्थ्यांची मागणी आहे.
(गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा देण्यासाठी राज्यात सुमारे१२ हजार ४१५ आरोग्यवर्धिनी केंद्रे )
(महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा सहा महिन्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करणे बंधनकारक)
(देशभरातील दीड लाख प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि उपकेंद्रांचे आरोग्यवर्धिनी केंद्रात रूपांतर करण्याचे निश्चित )(सध्या अस्तित्वात असणाऱ्या कुटुंब कल्याण, माता-बाल आरोग्य सेवा, सांसर्गिक आजार उपचार सेवा तसेच असांसर्गिक आजार, कान-नाक-घशाचे आजार, दृष्टीसंबंधी आजार, अपघात आदी आरोग्य सेवा पुरविण्यात येणार आहेत ,
प्रतिक्रिया :
आधुनिक वैद्यकशास्त्रातील अनेक विषयांचे शिक्षण मिळते. यामुळे आयुर्वेद पदवीधारकांची केंद्रात थेट नियुक्ती करावी. त्यांच्यावर अभ्यासक्रमाचा आर्थिक भार टाकला जाऊ नये. शासनाने ग्रामीण भागात आयुर्वेदाची जनजागृती करण्यासाठी प्रोत्साहन द्यावे. या माध्यमातून जनतेचे आरोग्य संवर्धन, प्रबोधन, संरक्षण या गोष्टी साध्य करता येतील.
डॉ. विजय लोखंडे
प्रतिक्रिया :
वास्तविक आरोग्यवर्धिनी केंद्राची संकल्पना आजार होऊ नये म्हणून दक्षता घेण्यावर म्हणजे प्रतिबंधात्मक उपायांवर आधारित आहे. त्यास आयुर्वेदाशिवाय दुसरा कोणताही चांगला पर्याय नाही. आयुर्वेद शास्त्राच्या साडेपाच वर्षांच्या अभ्यासक्रमात 'स्वस्थवृत्त' या विषयांतर्गत त्याचे ज्ञान मिळते