Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, मार्च ०३, २०१९

पुरोगामी शिक्षक संघटनेचे जिल्हा परिषद समोर एकदिवसीय धरणे आंदोलन

समस्या निकाली न निघाल्यास 11 मार्च पासून साखळी उपोषण
जिल्ह्यातील शेकडो शिक्षकांची उपस्थिती, शिक्षिकांचा लक्षणीय सहभाग
चंद्रपूर/प्रतींनिधी:-
 
जिल्हा परिषद चंद्रपुर अंतर्गत कार्यरत प्राथमिक शिक्षकांच्या बऱ्याच दिवसापासून प्रलंबित 25 समस्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले, याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी वारंवार चर्चा करण्यात आल्या, निवेदने दिली मात्र समस्या सुटायच्या ऐवजी वाढतच चालल्या आहेत करिता शिक्षकांच्या न्याय मागण्यांना वाचा फोडण्यासाठी शनिवार 2 मार्च 2019 ला जिल्हा परिषदेसमोर एकदिवसीय लाक्षणिक धरने आंदोलन महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने करण्यात आले. यावेळी जिल्ह्यातील शेकडो शिक्षक शिक्षीकांची उपस्थिती होती.

आजही प्रशासनाने समस्या सोडवण्यासाठी काहीच निर्णय न घेतल्याने दिनांक 11 मार्च पासून बेमुदत साखळी उपोषण करण्यात येणार आहे. शिक्षक, पदवीधर विषय शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख यांच्या प्रलम्बित समस्या पुढीलप्रमाणे आहेत.

वरिष्ट वेतन श्रेणी मंजूर यादी तात्काळ प्रकाशित करून वेतन निश्चिती करावी, डीसिपीएस च्या पावत्या मिळाव्यात, नुकत्याच झालेल्या अतिरिक्त मु.अ. समायोजनातिल सदोष समायोजन तात्काळ दूर करून नव्याने समायोजन करण्यात यावे, खाजगी शाळेतून आलेल्या 35 शिक्षकांचे प्रलंबित वेतन जिल्हा परिषदेतून अदा करण्यात यावे, 2/8/2006 च्या gr चा चुकीचा अर्थ काढून एकस्तर ऐवजी वरिष्ट वेतन श्रेणीनुसार वेतन काढन्याच्या पत्राला स्थगिती देऊन gr नुसार सर्व लाभ देण्यात यावे, पदोन्नतिने भरावयाची विस्तार अधिकारी रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावीत, 6 व्या वेतन आयोगाचे 5 ही हफ्ते gpf खात्यात जमा करण्यासाठी शिबिराचे आयोजन करावे, जिल्ह्यातील कार्यरत सर्व शिक्षकांचे सेवा पुस्तक अद्यावत करुन पडताळणी करण्यासाठी शिबिराचे आयोजन करावे, दि.23/10/2017 च्या शासन निर्णयानुसार आज पात्र ठरत असलेल्या शिक्षकाचे प्रस्ताव मागवून वरिष्ट वेतनश्रेणी मंजूर करावी, 2014 ला नियुक्ति दिलेल्या बी.एस.सी. पात्रता धारक विज्ञान विषय शिक्षकांना नियुक्ति दिनांकापासून वेतन श्रेणी देण्यात यावे, पदवीधर, ऊच्च श्रेणी मुख्याध्यापक व केंद्रप्रमुख यांची वरिष्ट वेतन श्रेणी व निवड श्रेणी मंजूर करावी, प्राथमिक शिक्षकांची निवड श्रेणी यादी प्रकाशित करून आता पर्यन्त किती शिक्षकाना निवड श्रेणी दिली गेली आणि पुढील निवड श्रेणी प्रतीक्षा यादी प्रकाशित करावी, जि.प. शिक्षकांचे वेतन राष्ट्रीयकृत स्टेट बँकेत करावे किंवा को- कॉपरेटिव्ह बँकेने आमचे खाते सी.जि.एस.पी अंतर्गत करून स्टेट बँक प्रमाने लाभ द्यावा, वैद्यकीय प्रतिपूर्ति देयके निकाली काढन्यासाठी शिबिराचे आयोजन करावे, मागील व या सत्रात मृत्यू पावलेल्या शिक्षक कर्मचाऱ्यापैकी सामूहिक अपघात विम्याचा लाभ दिलेल्या शिक्षक कर्मचाऱ्याची यादी संघटनेस देण्यात यावी तसेच प्रलंबित प्रकरणात तात्काळ लाभ देण्याची कार्यवाही प्रशासनाकडून व्हावी, या सत्रात बी.एस.सी. पूर्ण केलेल्या विज्ञान विषय शिक्षकांना वेतन श्रेणी मंजूर करावी, या व अन्य अश्या 25 मागण्यांचा समावेश आहे. 

आंदोलनात उपस्थित शिक्षकांना शिक्षक नेते विजय भोगेकर, हरीश ससनकर, अल्काताई ठाकरे, चंदाताई खांडरे, नारायण कांबळे, श्याम लेडे, रामराव हरडे, नगाजी साळवे, ओमदास तुराणकर, सुनीता इटनकर, मधुकर दडमल, प्रतिभा उदापुरे, जीवन भोयर, संजय चिडे, गणपत विधाते, मोरेश्वर बोनडे यांनी संबोधित केले. आंदोलनात जिल्ह्यातील शेकडो शिक्षक मोठ्या संख्येत उपस्थित होते. आंदोलनाचे सूत्रसंचालन अलिरजा अजानी यांनी केले. उपस्थित सर्वांचे जिल्हा पुरोगामी पदाधिकारी दीपक वर्हेकर, रवी सोयाम, निखिल तांबोळी, लोमेश येलमुले, अनंता रासेकर, सुनीता इटनकर, माधुरी निंबाळकर, शालिनी देशपांडे, सुलक्षणा क्षीरसागर, दिलीप इटनकर, सुनील कोहपरे, किशोर आनंदवार, रामेश्वर सेलोटे, भाऊराव कावळे, अशोक दहेलकर, हेमंत वागदरकर, पी.टी.राठोड, सुभाष अडवे, प्रभाकर भालतडक, ता.रा.दडमल, गजानन चिंचोळकर, गणेश चव्हाण, राजू चौधरी, आकाश झाडे, अर्चना येरने, चंदा धारने, माधुरी काळे, कल्पना महाकाळकर, लता मडावी, मनोज बेले, सुधाकर कनाके, सतीश शिंगाडे, राजू घोरुडे, नरेंद्र मुंगले, सलीम तुरके, जगदीश ठाकरे, बाळू गुंडमवार, संदीप कोंडेकर, गणपत विधाते, संदीप चौधरी, वहिद शेख, विनोबा आत्राम, रणजित तेलकापल्लीवार, विक्रम ताळे, मनोज बुटले, नरेश बोरीकर, पंकज तांबडे, नरेंद्र डेंगे, रामेश्वर मेश्राम, सुधाकर कोल्हे, निरंजन गजबे, विजय कुंभारे, कैलास कोसरे, अतुल तिवाडे यांनी आभार व्यक्त केले, यावेळी पंधराही तालुक्यातील शेकडो शिक्षक शिक्षिका उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.