Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, मार्च ०२, २०१९

हजारो नागरिकांसह धारीवाल कंपणीवर धडकला मोर्चा


15 दिवसाच्या आत लावणार बैठक, धारीवालचे आश्वासन 


चंद्रपूर - बेरोजगारांना रोजगार दया या मूख्य मागणीसह ईतर मागण्यांसाठी आज सामाजिक कार्यकतें किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वात हजारो नागरिकांचा लक्षणीय मोर्चा धारीवाल कंपणीवर धडकला. यावेळी धारीवाल कंपणीच्या मुख्य गेटच्या पहिलेच पोलिसांनी बॅरीकेट लावून मोर्चाला अडवीले त्यामुळे काही काळ तणावपुर्ण वातावरण निर्माण झाले मात्र तहसलीदार यांच्या मधस्ती नंतर धारीवालच्या अधिका-यांनी स्वता गेट बाहेर येवून निवेदण स्विकारत 15 दिवसांच्या आत किशोर जोरगेवार यांची बैठक लावून मागण्या सोडवीण्याचे आश्वासण दिले. त्यानंतर मोर्चेकरु शांत झाले.
स्थानिक नागरिकांनाच नौकरी देण्यात यावी, सी.एस.आर. फंडाचे वापर युवकांचे व महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी करण्यात यावे, अवैधरीत्या होणारी जड वाहतूक बंद करण्यात यावी, प्रदूषन रोखन्याकरीता उपाययोजना करण्यात याव्या, प्रदूशनामुळे होणाÚया शेतपिकांची नुकसान भरपाई देण्यात यावी. येथे कार्यरत कामगारांना वेतन वाढ देवून सुरक्षा साधने उपलब्ध करुन देण्यात यावी, कंपनीने येथील नागरिकांना निम्य दर्जाची वागणूक देने बंद करावे, कंपणी सुरु होतांना गावक-यांना दिलेल्या आश्वासनांची कंपणी व्यवस्थापणाने पूर्तता करावी, या मागण्यासाठी आज 2 मार्च ला दूपारी सामजिक कार्यकर्ते किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वात धारिवाल कंपनीवर भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाची सूरूवात गांधी चौक येथील माहात्मा गांधी यांच्या पुतळयाला मार्ल्यापण केल्या नंतर बाईक रॅलीने करण्यात आली. मोर्चाच्या मार्गावरील महापुरुषांच्या पुतळ्यांना मार्ल्यापण करुन ही रॅली ताडाळी टी पाईंट जवळ पोहचली त्यानंतर रॅलीचे सभेत रुपांतर झाले. या सभेत बोलतांना जोरगेवार यांनी धारीवाल कंपणीचा मुजोरी पणा यापुळे खपवून घेणार नाही असा ईशारा देत हा मार्चा धारीवाल कंपणीच्या मुख्य गेटकडे वळवला या दरम्याण पोलिसांचाही मोठा बंदोबस्त मोर्चासह चालत होता. हा मोर्चा धारीवाल कंपणीच्या गेट जवळ पोहचताच पोलिस प्रशासनाने बॅरीकेटींग करुन मोर्चाला अडवीले. मोर्चातील एका शिष्टमंडळानेच आत जावे अशी भूमीका पोलिस प्रशासनाची होती. मात्र जोरगेवारांना हे मान्य नसल्याने तणाव निमार्ण झाला. वाढता तणाव पहाता तहसीलदार आणि पडोलीच्या पोलिस ठाणेदार यांनी मधस्ती करुन कंपणीच्या अधिका-यांना निवेदन स्विकारण्यासाठी बाहेर बोलावले यावेळी जोरगेवार यांनी आपल्या मागण्यांचे निवेदण दिले. यावेळी धारीवाल कंपणीच्या व्यवस्थापणाने 15 दिवसांच्या आत एक बैठक लावून या सर्व मागण्यांवर विचार केला जाईल असे आश्वासण दिले. मात्र जोरगेवार यांनी धारीवालच्या अधिका-यांवर विश्वास नसल्याचे सांगत आंदोलन सुरुच ठेवले त्यानंतर तहसीलदार यांनी मधस्ती करत धारीवाल कंपणी 15 दिवसांच्या आत बैठक लावेल अशी हमी दिली. त्यांनतर मोर्चेकरु शांत झाले. या बैठकीत किशोर जोरगेवार यांच्यासह 13 गावातील प्रतिनीधी उपस्थित राहणार आहे. आज निघालेल्या या लक्षणीय मोर्चात युवक, महिला व शेतकरी बांधव हजारोच्या संख्येने सहभागी झाले होते.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.