Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, मार्च २४, २०१९

चंद्रपूर लोकसभेसाठी विनायक बांगडे यांना काँग्रेसची उमेदवारी

 
बाळू धानोरकर यांना तिकीट नाकारले 

चंद्रपूर/प्रतिनिधी:

चंद्रपूर लोकसभेसाठी कुणाला उमेदवारी द्यावी यासाठी काँग्रेमध्ये सुरु असलेला तिढा अखेर सुटला आहे. शुक्रवारी रात्री उशिरा हि यादी जाहीर करण्यात आली . विशेष म्हणजे शिवसेनेचे आमदार बाळू धानोरकर यांना काँग्रेस कडून उमेदवारी मिळणार हे जवळ जवळ निश्चित झालं होतं. मात्र भाजपने वर्धा मतदारसंघातून रामदास तडस यांना उमेदवारी दिल्याने काँग्रेस समोर मोठा पेच उभा झाला. तडस हे तेली समाजातील मोठं प्रस्थ आहे. काँग्रेस ने विदर्भातील बहुतांश जागी मराठा-कुणबी समाजातील व्यक्तींना उमेदवारी दिली आहे त्यामुळे विदर्भात मोठ्या संख्येत असलेला तेली समाज नाराज होईल अशी काँग्रेसला भीती होती. त्यामुळे अखेरीस बाळू धानोरकर यांच्या ऐवजी विनायक बांगडे यांना चंद्रपूर लोकसभेसाठी उमेदवारी देण्यात आली.मात्र बांगडे यांच्या उमेदवारीने कॉंग्रेसमध्येच नाराजी  विरोधाचा सूर आहे,  

तर धानोरकर यांना सीट न मिळाल्याने काँग्रेस-राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी दिसून येत आहे जिल्ह्यात प्रथमता एक दमदार उमेदवार काँग्रेसला मिळाला असताना सुद्धा त्याला तिकीट नाकारून पक्षाने एक कमजोर उमेदवार उभा केलेला आहे त्यामुळे ही निवडणूक भाजपाला सोपी जाणार आहे पक्षाने आपला निर्णय बदलवावा अशी मागणी घेवून पदाधिकाऱ्यांनी आंदोलन पुकारून निषेध व्यक्त केला.


काँग्रेस चे उमेदवार विनायक बांगडे हे काँग्रेस मध्ये १९७४ पासून कार्यरत आहेत.१९९८ ते २०१३ पर्यंत सलग १५ वर्ष काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष होते.१९९५ आणि १९९९ मध्ये चंद्रपूर मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली मात्र दोन्ही वेळा अपयश आले.  

 अचानकपणे जाहीर झालेल्या या यादित विनायक बांगडेचे नाव ऐकून अनेकांना धक्काच बसला,बांगडे यांच्या उमेदवारीने भाजपचे हंसराज अहिर यांना हि निवडनुक सोपी जाणार असल्याची चर्चा सुरु आहे. 

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.