Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, मार्च १७, २०१९

चंद्रपूरातील दाट वस्तीत शिरली अस्वल;अन शहरभर गोंधळ

चंद्रपूर/प्रतिनिधी:

चंद्रपूर शहरातील बालाजी वॉर्ड भागात शनिवारी सकाळच्या सुमारास अस्वल दिसल्याने एकच खळबळ उडाली.  शहरातील बालाजी वॉर्ड परिसर हा दाट लोकवस्तीचा परिसर असून याच भागातील एका घरानजीक  अस्वल लपून बसल्याचे दिसताच गावभर बोंब झाली. NGO  व वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले  त्यांनी अस्वलाला भूलीचे इंजेक्शन देऊन पकडण्यात आले.चंद्रपूर शहराला लागून जंगल आहे. पाणी, भक्ष्य किंवा अन्य कारणामुळे वन्यप्राणी अनेकदा शहरात येतात.सध्या उन्हाळा सुरु झाला असून शहरात उन तापू लागले आहे.त्यामुळे शहरानजीकच्या वस्तीत जंगली प्राणी भटकू लागतात,अशीच भटकत भटकत हि अस्वल देखील या परिसरात आली अस्वली असा अंदाज व्यक्त केला जात आहे. घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांसह इको-प्रो आणि हॅबीटॅट कॉन्सरवेशन सोसायटीचे सदस्य तसेच काही स्थानिक नागरिक या ठीकानी उपस्थित झाले.या अस्वलीला बघण्यासाठी परिसरात चांगलीच गर्दी जमली होती.अथक परिश्रमानंतर  दहशद निर्माण करणाऱ्या अस्वलाला बेशुद्ध करून पकडण्यात वनविभाग व NGO ला यश आल्याने स्थानिकांचा जीव भांड्यात पडला.
महेश महाशयाने लावली जिवाची बाजी 

 शनिवारी अस्वल शहरात शिरल्याची बातमी गावभर पसरली.तितक्यात NGO घटनास्थळी आले.अश्यातच शहरात विविध कार्यानमधून अग्रेसर असलेले तसेच युवामित्र फाउंडेशनचे महेश काहीलकर यांना अस्वल शहरात शिरल्याची माहिती मिळाली. तितक्यात ते देखील घटनास्थळी पोहचले. याठिकाणी सकाळी अस्वलीला बघण्यासाठी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती,चहू बाजू नागरिकांची गर्दी होती. अश्या परिस्थिती अस्वल घाबरली व चवताळली होती.कालांतराने वनविभागाची टीम घटनास्थळावर संपूर्ण साहित्यासह पोहचली व अस्वलीला इंजेक्शन देऊन बेशुद्ध करण्यात आले.आणि तिला स्थलांतरण करण्याची प्रक्रिया सुरु झाली.हा डार्ट व्यव्यस्थित बसला देखील, मात्र अस्वल लपून बसलेल्या ठिकाणापासून पिंजऱ्यात आणण्यासाठी लागणाऱ्या वेळेत अस्वल पुन्हा शुद्धीवर आली.यावेळी प्रथम  महेश हे अस्वलीला पकडून पिंजऱ्यात टाकतच होते तितक्यात अस्वल शुद्धीवर आली आणि तिने धाडकन खाली उडी घेतली. हि मुव्हमेंट होताच वनविभागाचे कर्मचारी व NGOचे सेवक घाबरले मात्र महेशची बुद्धी तितक्यात काम केली आणि त्याने क्षणाचाही विलंब न करता शुद्धीवर आलेल्या अस्वलीचा तोंड व गळ्यावर स्वतःचा  संपूर्ण भार टाकला त्यांनतर सर्वानी तिला पकडले व दाबून धरले, यानंतर जाळ्यात टाकून तिला पुन्हा बेशुद्ध करण्यात आले,व पुढील कारवाईसाठी तिला वनविभाच्या स्वाधीन करण्यात आले.शहराच्या मध्यभागी असलेल्या गर्दीमुळे अस्वलाला पकडणे जोखमीचे होते.

 सावधानीसाठी दंगा नियंत्रण पथकाला पाचारण करण्यात आले.मात्र या  चवताळलेल्या अस्वलीला जर का वेळेवर महेशने पकडले नसते तर एखादी अनुचित प्रकार नक्कीच घडला असता असे या विडिओच्या माध्यमातून दिसून येते,महेश हे कुठले शासकीय कर्मचारी नाही मात्र या अस्वलीला पकडण्यासाठी महेशने धाडस दाखविले व आपल्या जीवाची बाजी लावत अस्वलीला दाबून धरले.महेश हे शहरात युवामित्र फाउंडेशन चालवतात व विविध सामाजिक कार्यक्रम करीत असतात,या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होताच महेशचे सर्वत्र कौतुक होऊ लागले,सोशल मीडियावर महेशवर अभिनंदनाचा वर्षाव होऊ लागला.

मानव-वन्यजीव संघर्षांचा इतिहास शेकडो वर्षांचा आहे. ज्या भागात जास्त जंगल आहे त्या भागात प्राण्यांची संख्या वाढली पण अधिवासाचे क्षेत्र कमी झाले. त्याचा परिणाम प्राणी जंगलाबाहेर पडण्यात झाला आणि या संघर्षांत वाढ झाली.त्याला कारण मानवाचा वन्यप्राण्यांच्या अधिवासात प्रवेश, बेसुमार वृक्षतोड, त्यातून घटत गेलेले जंगलाचे प्रमाण आणि वेगाने विस्तारत असलेले नागरी जीवन. यामुळे हा संघर्ष सध्या वन्यप्रान्यांना जितका घातक होत आहे तितकाच माणसाच्या जीवाला देखील धोका निर्माण होऊ लागला आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.