Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, मार्च ०१, २०१९

कराड उत्तर हा भाजपचाच : विक्रम पावस्कर

उंब्रज :- ता.खटाव जि.सातारा (सतीश डोंगरे मायणी)

येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वारदराज मंगल कार्यालयात कराड उत्तर मधील समर्थकांची व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे संपर्क साधला त्या कार्यक्रमध्ये बोलताना भाजप जिल्हाध्यक्ष विक्रम पावस्कर यांनी कराड उत्तर हा भाजपचाच असल्याचे ठणकावून सांगितले याच बरोबर सातारा कोरेगाव कराड दक्षिण व मन खटाव मध्ये सुद्धा लढणार असल्याचे सांगितले . यावेळी मनोजदादा घोरपडे ,विजयाताई गुरव.सूर्यकांत पडवळ .महेश जाधव प्रमोद गायकवाड जयवंत जाधव . युवराज साळुंखे महेंद्र डुबल .यांची प्रमुख उपस्थिती होत. 


             यावेळी पुढे बोलताना पावसकर म्हणाले , राज्यात युती झाली असून जागा वाटप अजून झाले नाही . कोणता मतदार संघ कोणी लढवायचा हा निर्णय पक्ष घेणार असून आम्ही सातारा जिल्ह्यात पाच मतदारसंधी लढवणार असून कराड उत्तरामध्ये भाजपचे उमेदवार मनोजदादा घोरपडे यांनी मागील चार वर्षापासून सातत्याने पक्ष बांधणीसाठी काम केले  असून त्यांचा जनसंपर्क चांगला आहे . त्यांनी विकास कामांच्या माध्यमातून कराड उत्तरेच्या जाणतेढी नाळ जोडलेली आहे. २०१४च्या निवडणुकीत परावभावाला सामोरे जाऊन सुद्धा आजपर्यंत कर्तव्यनिष्ठेने पक्षाचे व जनतेचे काम करत असून त्यांची पो चपावती म्हणून पक्ष त्यांना २०१९ ची उमेदवारी व जनता त्यांना विजयी मते देणार अहे ,. तेव्हा कार्यकर्त्यांनी विचलित न होता केवळ लोकसभा व विधानसभा मध्ये पक्षाच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी प्रयत्न करावेत ,असे आवाहन केले 

यावेळी बोलताना मनोजदादा घोरपडे म्हणाले , केवळ नरेंद्र मोदी यांनी      चांगले काम केले असून २०१९ ला लोकसभेमध्ये पूर्ण बहुमतात सरकार येणार  सून नरेंद्र मोदी पुन्हा एकदा भारताचे पंतप्रधान होणार आहेत, राज्यात सुद्धा सेना भाजपचे सत्ता येणार असून कराड उत्तर मध्ये मी स्वतः लढणार आहे . तथा सूचना मला पक्षाच्या वरिष्ठांकडून आल्या आहेत .


मतदारसंघात कोण काय बोलते याला महत्व नसून कार्यकर्त्यांनी आज पासून कमला लागाबे कमल हेच आपले चिन्ह असून लोक सभा व विधानसभेसाठी कराड उत्तरे मधून मतांचा विक्रम आपल्याला करायचा आहे . 


          सादर कार्यक्रमास यशवंत जगदाळे , राजू चव्हाण ,.प्रशांत कदम, संदीप चव्हाण ,अशोक जाधवम रोहित डुबलं संतोष पाटील सुरेश तात्या पाटील नाना देशमुख , अँड विशाल रोजवळ आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक सूर्यकांत पडवळ यांनी केले तर आभार प्रदर्शन अनिल माने यांनी केले . 


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.