चंद्रपूर/प्रतिनिधी:
पर्यटकांच्या वाढत्या संख्येच्या दृष्टीकोनातून उपसंचालक बफर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प अंतर्गत दिनांक 1 मार्च 2019 पासून नव्याने तीन गेट सुरु करण्यात येत आहे.
पर्यटकांच्या वाढत्या संख्येच्या दृष्टीकोनातून उपसंचालक बफर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प अंतर्गत दिनांक 1 मार्च 2019 पासून नव्याने तीन गेट सुरु करण्यात येत आहे.
ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोन क्षेत्रामध्ये पर्यटकांना जैवविविधतेचा व वन्यजीवांचा अभ्यास करता यावा, तसेच वन्य प्राणी दर्शनाचाही आनंद घेता यावा. यासाठी मामला , सिरकाडा गेट आणि पांगडी गेट अशी आणखी तीन गेट सुरु करण्याचा निर्णय चंद्रपूर वनप्रशासनाने घेतला आहे. ही तिन्ही गेट सकाळी 6 वाजेपासून ते दुपारी 2.30 पर्यंत सुरु राहतील. याचे प्रवेश शुल्क 650 रुपये, जिप्सी शुल्क 2200 रुपये, मार्गदर्शक शुल्क 350 रुपये राहील. तरी इच्छुक पर्यटकांनी शासनाच्या महाइकोट्युरीझम (http:/www.mahaeacotourism.gov.in) या संकेतस्थळावर नोंदणी करावी, असे आव्हान वनप्रशासनाच्या वतीने करण्यात आले.