Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, मार्च ०३, २०१९

राम नाईक यांचा ‘चरैवेति, चरैवेति ’ आत्मचरित्रात्मक लेखसंग्रह प्रकाशित

Ram Naik S 'Charaiveti, Charaiveti' autobiographical articles-collection published

राम नाईक यांचे जीवन भावी लोकप्रतिनिधींसाठी मार्गदर्शक :
                                    - राज्यपाल  विद्यासागर राव


 मुंबई दि.3: राज्यपाल पदाच्या गेल्या साडेचार वर्षांच्या कारकिर्दीत राम नाईक यांनी उत्तर प्रदेश उत्तम प्रदेश’ करण्याच्या दृष्टीने प्रामाणिक प्रयत्न केले. आपण केलेल्या कार्याचा अहवाल लोकांपुढे नियमितपणे मांडणारे राम नाईक देशातील सर्व राज्यपालांसाठी आदर्श राज्यपाल आहेत. विरोधी पक्षात असो वा सत्तापक्षात असोलोकसेवा हा धर्म मानणारे राज्यपाल राम नाईक यांचे सार्वजनिक जीवन भावी लोकप्रतिनिधींसाठी मार्गदर्शक असल्याचे गौरवोद्गार महाराष्ट्राचे राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी आज येथे काढले.
       राम नाईक यांच्या अनुभवपर आत्मचरित्रात्मक लेखांचे संकलन असलेल्या चरैवेतिचरैवेति या ग्रंथाच्या सिंधी आवृत्तीचे प्रकाशन विद्यासागर राव यांच्या हस्ते आज  राजभवन येथे झालेत्यावेळी ते बोलत होते.
       कार्यक्रमास राज्यपाल राम नाईकआमदार आशिष शेलारभारतीय सिंधू सभेचे अध्यक्ष लछमनदास चंदीरामाणीमहेश तेजवानीलढाराम नागवाणीअजित मन्याल व अनेक मान्यवर उपस्थित होते.
       एका माजी केंद्रीय मंत्र्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अंदमान येथील स्मारकावरील सावरकरांच्या काव्य पंक्ती काढल्यानंतर राम नाईक यांनी तो मुद्दा संसदेत प्रखरपणे मांडला व कालांतराने त्या पंक्ती त्या ठिकाणी पुन्हा सन्मानाने बसविल्यायाचे स्मरण विद्यासागर राव यांनी दिले.
       रेल्वे राज्य मंत्री या नात्याने राम नाईक यांनी जनसामान्यांचा रेल्वे प्रवास सुखद करण्याच्या दृष्टीने अनेक निर्णय घेतलेतर पेट्रोलियम मंत्री म्हणून त्यांनी एलपीजी गॅस जोडण्या अधिकाधिक लोकांना दिल्या. सामान्यांशी नाळ कायम जोपासलेले राम नाईक उत्कृष्ट लोकसेवक असल्याचे विद्यासागर राव यांनी सांगितले.
       लोक प्रतिनिधी म्हणून विरोधी पक्षात राहून देखील जनतेची सेवा करता येते असे सांगून आज खासदारांना दिला जाणारा खासदार निधी सुरु करणे तसेच बॉम्बेचे नामकरण मुंबई करणे यासाठी आपण विरोधी पक्षात असताना लढा दिल्याचे, तसेच पेट्रोलियम मंत्री या नात्याने कारगिल युद्धातील शहिदांच्या कुटुंबियांना पेट्रोल पंप व गॅस एजन्सी देण्याचे काम आपण केले असल्याचे राम नाईक यांनी यावेळी सांगितले.
       आपल्या प्रदीर्घ वाटचालीत लालकृष्ण अडवाणीहशू अडवाणीकर्करोग तज्ञ डॉ. सुरेश अडवाणी यांसह अनेक सिंधी बांधवांचे योगदान राहिले असल्याचे राम नाईक यांनी नमूद केले.
       चरैवेतिचरैवेति’ हे पुस्तक जर्मनपर्शियनअरेबिक यांसह एकूण दहा भाषांमध्ये भाषांतरित झाल्याचे नाईक यांनी सांगितले.
       आमदार श्री. शेलार तसेच सिंधी आवृत्तीचे अनुवादक सुखरामदास साधवाणी यांनी यावेळी आपले मनोगत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अजित मन्याल यांनी केले.    

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.