Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, मार्च ०३, २०१९

भाजपा विजय संकल्प बाइक रॅॅली




नागपूर- आज भारतीय जनता पार्टी नागपुर जिल्हा च्या वतीने संकल्प से सिद्दी या कार्यक्रमा अंतर्गत पूर्ण देशभरात प्रत्येक मतदार संघात भाजपा विजय संकल्प बाइक रॅॅली चे आयोजन करण्यात आले होते.त्यानुसार आज दिनाक ०३/०३/१९ ला सावनेर -कळमेश्वर विधानसभा मतदार संघात ही या रॅॅली चे आयोजन मोठया जल्लोषा च्या वातावरणात करण्यात आले होते.

या बाइक रॅॅली चे मोठया प्रमाणावर नियोजन करण्यात आले होते .या बाइक रॅॅली मध्ये सुमारे २५० ते ३०० च्या जवळजवळ मोटर बाइक घेउन कार्यकर्ते व् पदाधिकारी सहभागी झाले होते.ही बाइक रॅॅली आज सकाळी ८ वाजता विठ्ठल मंदिर धापेवाडा येथून पूजा करून व डॉ बाबासाहेब आंबेडकर व् छत्रपति शिवाजी महाराजांच्या स्मारकाला माल्यार्पण करून या भव्य बाइक रॅॅली चा शुभारंभ करण्यात आला.त्यानंतर मढ़ासावंगी ,पिपळा,मोहपा शहरातून ,खुमारी मांडवी वरून तेलगाव वरून तिदंगी वरून नंाादा गोमुख म्हणजेच सावनेर तालुक्यात शिरली त्यानंतर रायबासा मार्गे केळवद गावातून मुख्य महामार्गाने खापा शहरात दाखल झाली.जागोजागी भाजपा च्या कार्यकर्त्यांच्या वतीने या बाइक रॅॅली चे स्वागत करण्यात आले तसेच या बाइक रॅॅली मधील कर्य्कर्त्याना पाणी ,शरबत ,फळेे वाटप करण्यात आली.ही बाइक रॅॅली मग प्रवास करीत व् जोरदार नारेबाजी करीत पाटनसावंगी गावातून सावनेर शहरात दाखल झाली त्यानंतर शहरातून फिरून या बाइक रॅॅली चा समारोप वानखेड़े लाॅॅन सावनेर येथे करण्यात आला.

या बाइक रॅॅली चे नेतृत्व जिल्हा भाजपा चे महामंत्री श्री संजय टेकाडे व विधानसभा विस्तारक श्री रामराव मोवाडे यांनी केले .प्रामुख्याने या बाइक रॅॅली मध्ये भाजपा चे जिल्हा अध्यक्ष डॉ राजीव पोतदार तसेच श्री अशोक धोटे ,श्री रमेश मानकर ,श्री प्रकाश टेकाडे ,श्री सोनबाजी मुसळेे,श्री इमेश्वर यावलकर,दिलीपराव धोटे ,अशोक तांदुळकर देविदास मदनकर ,विजय देशमुख आदी मान्यवर तसेच इतर पदाधिकारी नेते कार्यकर्ते उपस्थित होते .

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.