Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, मार्च ०५, २०१९

महिंद्रा तर्फे प्रोविंशिअल ऑटोमोबाइलमध्ये 'मेगा सर्व्हिस चेक-अप कॅम्प'



नागपूर ०५ मार्च २०१९ : महिंद्रा तर्फे त्यांच्या अधिकृत डीलरशिप असलेल्या प्रोविंशिअल ऑटोमोबाइलमध्ये सर्व प्रवासी वाहनांकरिता फ्री 'मेगा सर्व्हिस चेक-अप कॅम्प सुरु करण्यात आला आहे, या सर्व्हिस कॅम्पचे उदघाट्न नवल अधिकारी कमांडर श्री.पराग जोशी आणि श्रीमती सारा जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रोविंशिअल ऑटोमोबाइलचे सीईओ श्री. गुरमीत एस सूरी, सिनियर सर्व्हिस मॅनेजर श्री. राकेश बोरकर, प्रोविंशिअल ऑटोमोबाइलचे सीआरएम गुरजीत सिंह राजपूत उपस्थित होते. या कॅम्पचे आयोजन ०४ मार्च ते १२ मार्च या कालावधीत प्रोविंशिअल ऑटोमोबाईल, प्लॉट नं. जी -१७/१८, सेंट्रल एमआयडीसी, मेन रोड, हिंगना, नागपूर येथे करण्यात आले आहे.

या सर्व्हिस कॅम्पच्या कालावधीत, मोठ्या प्रमाणात ७५ गुणांची फ्री तपासणी केली जाईल, याशिवाय ग्राहकांना स्पेअरवर ५टक्के सवलत, मजूरी वर १० टक्के सवलत आणि मॅक्सिकेअर वर २५ टक्के सवलत देण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त, जर ग्राहकांनी 'विथ यु हमेशा अँप' द्वारे सर्व्हिस अँपॉइन्टमेन्ट घेतली असेल तर त्यावर वॉशिंग ४ मार्च ते १२ मार्च या कालावधीत फ्री देण्यात येईल.

या मेगा सर्व्हिस कॅम्पच्या व्यतिरिक्त प्रोविंशिअल ऑटोमोबाइलने आपल्या ग्राहकांसाठी अनेक बक्षिसे आणले आहेत, दररोज संध्याकाळी लकी ड्रॉ घेण्यात येईल तसेच दररोज एक ग्राहक सरप्राईज गिफ्ट जिंकू शकेल.

या कॅम्पच्या कालावधीत विविध गेम, फ्री आरोग्य आणि डोळे चेक-अप कॅम्पचे आयोजन केले जाईल, तसेच तीन वर्षाहून अधिक जुन्या वाहनांची तज्ञांकडून फ्री मूल्यांकन करण्यात येईल.

अधिक माहितीसाठी प्रोविंशिअल ऑटोमोबाइल प्लॉट नं, जी -१७/१८, सेंट्रल एमआयडीसी, मेन रोड, हिंगना या ठिकाणी भेट द्या, किंवा फोन नं ८३८००५५१२६, ९०११६६४९४७ वर संपर्क साधा.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.