Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, मार्च ३१, २०१९

अहिरांच्या प्रचारासाठी अमित शहा,उद्धव ठाकरे चंद्रपुरात येणार

ललित लांजेवार:
amit shah साठी इमेज परिणाम
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उजवा हात असलेले कट्टर हिंदुत्ववादी प्रतिमा ग्लॅमर नेतृत्व असलेले भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रपुरात येणार असल्याची चर्चा सध्या चंद्रपुरात रंगू लागली आहे, चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्राचे भाजप-शिवसेना-रिपाई (आ.) महायुतीचे उमेदवार हंसराज अहीर यांच्या प्रचारासाठी थेट अमित शहा चंद्रपुरात येत असल्याने सध्या सर्व कार्यकर्ते कामाला लागले आहे. ७ एप्रिलला शहा चंद्रपुरात येणार असल्याची चर्चा सध्या चंद्रपुरात आहे. मात्र अजून त्यांच्या कार्यक्रमाबद्दल अधिकृत घोषणा चंद्रपूर भाजपने केली नाही.

याचसोबत अहिर यांच्या प्रचारासाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होण्याची चिन्हे दिसत आहे.दोन दिवसाअगोदर झालेल्या बैठकीपासून ठाकरे यांना चंद्रपुरात बोलवण्याचा खटाटोप कार्यकर्ते करीत आहे, मात्र अहिरांच्या प्रचारासाठी येणाऱ्या दोन्ही नेत्यांच्या तारखा अजूनही डीक्लीअर झाल्या नाहीत.
गेल्या २००४-२००९,२००९-२०१४,२०१४-२०१९  सलग ३ टर्म चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्र अहिरांसाठी लकी ठरला आहे.मात्र  धानोरकरांच्या येण्याने अहिरांचे सध्या तळ्यात-मळ्यात झाले आहे.त्यामुळे यंदाची लढत हंसराज अहिर यांच्यासाठी प्रतिष्ठेची ठरणार आहे,त्यामुळे अहिर यांना युतीच्या स्टार प्रचारकांना बोलवावे लागत असल्याची कल-कल सोशल माध्यमात सुरु आहे.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.