Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, फेब्रुवारी १४, २०१९

हिंगणा येथे विमाशी संघाचे जिल्हा अधिवेशन रविवारी


नागपूर / अरूण कराळे
विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ जिल्हा नागपूर ग्रामीणचे वार्षिक अधिवेशन हिंगणा येथील नेहरू विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात रविवार १७ फेब्रुवारी रोजी सकाळी १० .३० वाजता आयोजीत करण्यात आले आहे . या अधिवेशनात जुनी पेन्शन योजना , सातवा वेतन आयोग , तसेच शिक्षक, विद्यार्थी व पालक यांच्या अनेक समस्यावर चर्चा होणार् आहे .अधिवेशनाचे अध्यक्ष माजी आमदार व्ही . यू . डायगव्हाने ,उदघाटक माजी मंत्री रमेशचंद्र बंग , तर प्रमुख पाहूणे म्हणून प्रसिध्द कवी प्रा. ज्ञानेश वाकूडकर , विमाशी संघाचे प्रांतीय अध्यक्ष श्रावण बरडे , विजुक्टाचे महासचिव डॉ .अशोक गव्हानकर ,मुख्याध्यापक संघाचे लक्ष्मण राठोड, महाराष्ट्र शिक्षक महामंडळाचे उपाध्यक्ष आनंदराव कारेमारे ,विमाशी संघाचे प्रांतीय सरकार्यवाह सुधाकर आडबले , प्रांतीय कोषाध्यक्ष अविनाश बडे ,प्रांतीय उपाध्यक्ष रमेश काकडे , नागपूर शहर अध्यक्ष विठ्ठल जुनघरे , शहर सरकार्यवाह प्रमोद रेवतकर प्रामुख्याने उपस्थित राहणार आहे .जास्तीत जास्त संख्येने शिक्षक ,शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष अनिल गोतमारे ,जिल्हा कार्यवाह संजय वारकर जिल्हा सहकार्यवाह अरूण कराळे ,विजय गोमकर ,धनराज राऊत दिनेश ढगे ,विष्णु राणे ,शैलेश येडके ,पुरुषोत्तम ढगे ,गोपाल फलके , विशाल बंड , विशाखा ठमके ,नंदा कुंभलकर ,दत्तराज उमाळे, लोकेश व्होरा ,प्रशांत पिंपळकर ,सचिन इंगोले ,संजय दाडे ,भूषण बेलेकर ,पितांबर खंते ,प्रल्हाद भूसारी ,शंकर पन्नासे ,केशव डेंगे ,सूर्यकांत वानखेडे ,संजय वांगे ,अमोल हिरडकर , जुगलकिशोर जयस्वाल, पंकज माने , सुरेश फलके , गंगाधर थोटे तसेच सर्व तालुका अध्यक्ष ,कार्यवाह व कार्यकारिणी सदस्यांनी केले आहे .

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.