Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, फेब्रुवारी २१, २०१९

ऊर्जानगर मध्ये पहिल्यांदाच आढळला मांडूळ साप




ऊर्जानगर-
वन्यजीवांसाठी लाभलेलं नैसर्गिक अधिवास असल्याने दिवसेन-दिवस काहीतरी दुर्मिळ प्राणी आढळत असतात, ह्या वेळी सुद्धा ऊर्जानगर वसाहतीत येथील हिराई गेस्ट हाऊस मध्ये रात्री ९ च्या सुमारास तेथील कर्मचाऱ्याला लालसर रंगाचा साप आढळल्याने त्यांनी, ऊर्जानगर येथील हॅबिटॅट कंसर्वेशन सोसायटी चे गणेश पिदूरकर यांना संपर्क साधून साप असल्याचे सांगितले, लगेच गणेश पिदूरकर वेळ न घालवता घटना स्थळी पोहचले व शहानिशा केले असता साधरणतः दोन फूट लांबीचा बिनविषारी मांडूळ प्रजातीचा साप असल्याचे निष्पन्न झाले.

मांडूळ साप हा वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ मध्ये परिरिष्ट २ मध्ये येतो, मांडूळ हा बिनविषारी साप लालसर तपकिरी रंगाचा, शरीर जाडसर गोल आकाराचे असते व त्याचे डोके ही शरीरापेक्षा लहान असते त्याचे डोकं व शेपूट हि सारखीच दिसत असल्याने त्याला दुतोंड्या असेही म्हणतात,विदर्भात त्याला मातीखाया नावाने सुद्धा ओळखतात हा साप पिल्लाना जन्म देतो व पिल्लं लहान असतांना त्यांच्या शरीरावर काळ्या रंगाचे पट्टे असतात, हा साप उंदीर, पक्षी, सरडे ही त्याचे भक्ष्य. 

सापांच्या प्रजातीतील मांडूळ ह्या सापाबद्दल अनेक गैरसमज समाजामध्ये पसरविले आहेत, मांडूळ सापाची तस्करी अलीकडे खूप वाढल्याचे दिसते, ह्या सापामुळे गुप्तधन शोधण्यास मदत होते, खूप धनप्राप्ती होते असे अनेक गैसमज लोकांमध्ये पसरले आहे, पण प्रत्यक्षात ही सगळी फसवेगिरी असल्याचे अनेकदा समोर आले आहे. गणेश पिदूरकर यांनी लगेच सापाला जवळच निसर्गाच्या सानिध्यात सोडण्यात आले
हॅबिटॅट कंसर्वेशन सोसायटी चे सुरज डहाके, हर्षल पिदूरकर, प्रणय मगरे,केशव कुळमेथे, मोनू खोब्रागळे,अनिल पटले,रविकिरण गेडाम, अमित माथनकर, आशिष गोहणे उपस्थित होते.




SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.