चिमूर/रोहित रामटेके
चिमूर तालुक्यातील संघारामगिरी (रामदेगी) हे तिर्थक्षेत्र हे ४५ वर्षांपासून बौद्ध व हिंदू धर्मियांचे श्रद्धास्थान म्हणून महाराष्ट्रात सुप्रसिध्द आहे ,अलीकडेच वनविभागाच्या अडेल तट्टू धोरणामुळे संघरामगिरी( रामदेगी) संकटात सापडली आहे , संघरामगिरी (रामदेगी) तिर्थक्षेत्र येथे मागील १ महिन्या अगोदर बिबट या प्राण्यांच्या हल्ल्यात १ भंते व १ दुकान चालकास स्वतःचे प्राण गमवावे लागले यामुळे यात्रेवर तथा पर्यटक स्थळ संघरामगिरी (रामदेगी) यावर बंदी घालण्यात आली असून संघरामगिरी (रामदेगी) बचाव या मागणी करीता दिनांक.१२ फेब्रुवारी ला चिमूर तहसिल कार्यालयावर मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. चिमूर येथील तक्षशिला बुद्धविहार येथून प्रारंभ होणाऱ्या मोर्च्यांचे नेतृत्व पूज्य भदंत ज्ञानज्योति महास्थवीर यांनी केले. तर या मोर्च्यात विविध मागण्या चे निवेदन तयार करण्यात आले असून त्यात प्रामुख्याने अनुसूचित जाती-जमाती व इतर पारंपरिक वननिवासी (वन हक्काची मान्यता)अधिनियम २००६ ची प्रभावी अंमलबजावणी करीत मौजा निमढेला येथील कक्ष क्र. ६० मध्ये ०.९९ हे. आर. जागा उपविभागीय अधिकारी वरोरा यांचे शिफारशीनुसार सामाजिक केंद्रासाठी व अनुसंघाने सामाजिक कामाकरिता देण्यात यावी, वनविभागाने वाहतूक पावती बंद करण्यात यावी, भाविक जनता व स्थानिक नागरिकांकरिता २४ तास रस्ता सुरू करण्यात यावा, जनतेच्या सौरक्षणाकरिता जाळीचे कंपाऊंड करण्यात यावे आदी विविध मागण्यांचा समावेश असलेले निवेदन उपविभागीय अधिकारी भैय्यासाहेब बेहरे यांना सर्वांच्या समक्ष देण्यात आले.व हा मूक मोर्चा बुद्धाचा शांतीचा मार्ग लक्षात घेऊन आयोजित करण्यात आला आहे, या मोर्च्यात सहभागी होण्याचे आवाहन भन्ते प्रभुद्धानंद, भन्ते अग्गज्योति, सलीम पठाण, विनोद देठे यांनी केले व याठिकाणी उपस्थित भदंत ज्ञानज्योति भंते , काँग्रेस पक्षाचे माजी आमदार डॉ.अविनाश वारजूरकर , माजी खासदार जोगेंद्रजी कवाडे , ऍड.कमला गवई बौद्ध उपसिका अमरावती, पंचायत समिती सदस्य तथा गटनेते रोशन ढोक , भारिप बहुजन महासंघ प्रदेश सचिव व माजी नगर सेवक कुशल मेश्राम राजू पाटील व आदि बौद्ध उपासक व बौद्ध उपसिका व भीमसेना व अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते.