विद्यार्थी गुणवत्ता विकास कार्यशाळा
नागपूर/अरुण कराळे:
नागपूर पंचायत समिती अंतर्गत वाडी बिट मधील वाडी, बाजारगाव व फेटरी समूह साधन केंद्रातील १५६ जि.प. शिक्षकांची कार्यशाळा दवलामेटीतील इन्फन्ट जीजस स्कुल मध्येपार पडली.
अध्यक्षस्थानी नागपूर पंचायत समितीचे सहाय्यक गट विकास अधिकारी तथा गटशिक्षणाधिकारी सुभाष जाधव होते . प्रमुख पाहूणे म्हणून शिक्षण विस्तार अधिकारी गोपाल कुनघटकर, रामराव मडावी, छाया इंगोले, गुलाब उमाठे, इन्फन्ट जीजस स्कुलच्या मुख्याध्यापिका शायनी मॅडम , केंद्रप्रमुख शरद भांडारकर, प्रेमा दिघोरे, बालसंस्कार केंद्राच्या वानखेडे मॅडम, डीआयइसीपीडीचे विषय सहायक राऊळकर, कुमरे, सलाम मुंबई फौन्डेशनच्या जिल्हा समन्वयक अॅड . उईके मॅडम, शांतीलाल मुत्था फौन्डेशन तालुका शिवशंकर घरडे प्रामुख्याने उपस्थित होते .
सर्वप्रथम श्री सरस्वती स्तवनाने कार्यक्रमाची सुरुवात करून उपस्थित मान्यवरांचे श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले. यानंतर वाडी व बाजारगाव केंद्रातील शैक्षणिक स्थिती, शासनाच्या योजना तसेच राबविण्यात येत असलेल्या सहशालेय उपक्रमाचे प्रोजेक्टरच्या साह्याने केंद्रप्रमुख शरद भांडारकर यांनी सादरीकरण केले.
मूल्यवर्धन शिक्षणाची तालुक्यातील सद्यस्थितीबद्दल शिवशंकर घरडे यांनी तर मूल्यांची रुजविण्यासाठी संस्कार तंत्राची माहिती श्रीमती वानखेडे यांनी दिली. अध्ययन निष्पत्ती व भाषा, गणित कृतीआराखडा याबाबत सर्वश्री राऊळकर व कुमरे यांनी माहिती दिली. तंबाखूमुक्त शाळा घोषित करण्यासाठी अकरा निकषांची पूर्तता करण्याबाबत अॅड . उईके मॅडम यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमा दरम्यान बिट मध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या व विविध स्पर्धेत विजेत्या शिक्षकांचा पुष्प देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गोपाल कुनघटकर , संचालन ललिता गोंडचर , आभार प्रदर्शन शरद भांडारकर यांनी केले . आयोजनासाठी मुख्याध्यापक भास्कर क्षिरसागर,पुरुषोत्तम चिमोटे, प्रवीण थेटे, प्रकाश कोल्हे, सुधाकर राऊत, सुधीर खोब्रागडे, स्मिता पोटदुखे, रोशन गणवीर आदींनी सहकार्य केले.