नागपूर / अरूण कराळे:
नागपूर पंचायत समिती नागपूर जिल्हा परिषद वाढीव उपकर योजना सन २०१८-२०१९ अंतर्गत पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-२ गोधनी (रेल्वे) येथे संकरीत जनावराचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते परिसरातील गोपालकांनी त्याची संकरीत जनावरे आणून प्रदर्शनाला उत्कृष्ट प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाचे उद्घाटन नागपूर पंचायत समिती सभापती नम्रता राऊत यांच्या हस्ते गोमातेचे पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नागपूर पंचायत समिती उपसभापती सुजित नितनवरे तर प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती सदस्य प्रभाकर उईके सरपंच दीपक राऊत, उपसरपंच विनायक खवले ग्रामपंचायत सदस्य शुध्दोधन कोलते, राहुल मनोहर, दिनेश डिवरे, राजू महाजन, प्रणिता डोंगरे, वर्गीस मॅडम, अलका नितनवरे, जयश्री टाकळखेडे, वनिता राजूरकर, सुचिता गजलवार, रोहिणी खोरगडे रियाज शेख, ग्राम विकास अधिकारी फुके उपस्थित होते.
प्रदर्शनात संकरीत वासरे, कालवडी, गाई, नर आदी गट करण्यात आले . प्रत्येक गटातील उत्कृष्ट जनावरांना पुरस्कार देण्यात आले यात संकरीत वासरांमध्ये प्रथम पुरस्कार अमरीत डेअरी फार्म, द्वितीय पुरस्कार भीमराव राऊत तृतीय पुरस्कार अमन डेरे ,संकरीत कालवडी मध्ये प्रथम पुरस्कार अमरीत डेअरी फार्म द्वितीय पुरस्कार विनोद आढावु, तृतीय पुरस्कार गौरव होले संकरित गाईमध्ये प्रथम अमरीत डेअरी फार्म, द्वितीय पुरस्कार लक्ष्मण डेरे, तृतीय पुरस्कार दिगाबर गजभिये ,संकरित नर मध्ये प्रथम पुरस्कार अमरीत डेअरी फार्म, द्वितीय पुरस्कार रवींद्र खवले, तृतीय पुरस्कार जनार्दन वानखेडे यांना देण्यात आले या सर्वांना रोख पुरस्कार प्रमाणपत्र तसेच दुग्ध व्यवसायासाठी उपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले .प्रत्येक सहभागी जनावराला प्रोत्साहनपर पारितोषिक देण्यात आले . गोधनी (रेल्वे) दवाखाना मार्फत उत्कृष्ट गोपालक म्हणून श्रीधर डेरे यांना सन्मानचिन्ह व शाल देऊन सत्कार करण्यात आला.
डॉ . शैलेश महाजन, डॉ . लई खान, डॉ .इलाही, डॉ . एन .डी .पाटील, डॉ . बडोले, डॉ . सवयीमुल, डॉ .किशोर जाने यांनी जनावरांचे परीक्षण केले. प्रास्ताविक डॉ . प्रियवंदा सिरास ,संचालन डॉ .पवन भागवत ,आभार प्रदर्शन डॉ . गजानन काकड यांनी केले .आयोजनासाठी नागपूर पंचायत समितीचे पशुधन विकास अधिकारी डॉ . प्रियवंदा सिरास, डॉ .गजानन काकड, डॉ . श्वेता खरबीकर, डॉ .उमाकांत गिरी,डॉ .चंद्रकांत गडपाले,डॉ . दिलीप उघडे, डॉ . गोपाल फड, डॉ . दिनेश करडभाजने, डॉ . उत्पल डांगोरे, डॉ . वैशाली कडू, डॉ . साबळे, डॉ . पवन भागवत, डॉ . रमेश गोरले, डॉ .शकील अगवान, बिंड, प्रकाश घागरे, दिनेश इंगळे, राहुल रंधई, राजू गावंडे आदींनी परिश्रम घेतले .