Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, फेब्रुवारी १४, २०१९

हाट्टीत मोफत ४६ Gas कनेक्शन वाटप

खबरबात / गणेश जैन , धुळे

बळसाणे : माळमाथा परिसरातील  हाट्टी खुर्दे. येथे शुभंकर गॅस सर्विसेस साक्री.यांच्या तर्फे गॅस संच वाटपाचा कार्यक्रम  नुकताच संपन्न झाला  कार्यक्रमाचे आयोजक समाजभुषण दादासो,त्र्यबक गोरख पदमोर(प.स.सदस्य साक्री) कार्यक्रमाचे अध्यक्ष,सोपान पदमोर (भारताीय जनता पार्टी धुळे)तसेच भारताीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस  वल्लभ भदाणे.तसेच इंदवे गावाचे लोकनियुक्त सरपंच निलेश देवरे तसेच भारताीय जनता पार्टीचे आजी माजी कार्यकर्ते व गावातील ग्रामस्त मोठ्या संख्येने उपस्त्थित होते.राज्याचे रोहयो मंत्री जयकुमार रावल व दोंडाईचा ऋषी उत्पन्न बाजार समितीचे नारायण पाटील यांच्या आदेशाने गँस संच वाटपाचा कार्यक्रम घडवून आल्याचे त्र्यंबक पदमोर यांनी सांगितले

कार्यक्रमा प्रसंगी गावातील यशस्वी झालेल्या विध्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. ज्योती साहेबराव खंडेकर यांनी ग्रॅज्युएट आॅप्ट्युट टेस्ट मध्ये धुळे जिल्ह्या मध्ये प्रथम क्रमांक मिळविला त्या बद्दल कार्यक्रमाचे अध्यक्ष,सोपान पदमोर यांच्या हस्ते करण्यात आला.तसेच रावसाहेब गोरख पदमोर यांची धुळे जिल्हा सर्वोत्कूष्ट वक्ता तथा युवा व्याख्याते म्हणुन निवड झाल्यास त्यांचा सत्कार समाजभुषन दादासो त्र्यंबक गोरख पदमोर यांच्या हस्ते करण्यात आला.कार्यक्रमात वल्लभ भदाणे.यांनी गावातील ग्रामस्थांना प्रधानमंत्री उज्वला योजने बद्दल मार्गदर्शन केले.तसेच शुभंकर गॅस सर्विसेस साक्रीचे डाॅ.संगीता पवार  यांनी सुध्दा प्रधानमंत्री उज्वला योजने बद्दल मार्गदर्शन केले.व तसेच  रावसाहेब पदमोर यांनी तरूणांचा आत्मविश्वास वाढावा यासाठी तरूणांना प्रेरणादायी भाषण केले.तसेच दादासो त्र्यंबक गोरख पदमोर यांनी सुध्दा यशस्वी विध्यार्थ्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.प्रधानमंत्री उज्वला योजना अंतर्गत शुभंकर गॅस सर्विसेस साक्री तर्फे गावातील एकुण ४६ कुटूबांना मान्यवरांच्या हस्ते गॅससंच वाटप करण्यात आले. तरी गावातील ग्रामस्थांनी भरभरून प्रतीसाद दिला


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.