वर्धा आणि हिंगण्यात वीज दीड लाखाच्या पकडल्या चोऱ्या
नागपूर/प्रतिनिधी:
नागपूर ग्रामीण मधील हिंगणा आणि वर्धा शहरातील गोंड प्लॉट परिसरात महावितरणच्या स्थानिक कर्मचाऱ्यांनी एकूण सहा वीज चोऱ्या पकडून वीज चोरांकडून सुमारे दीड लाखाची वसुली करण्यात आली आहे.
बुधवार दिनांक १३ फेब्रुवारी रोजी हिंगणा उपविभागीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी भिवसेन खोरी परिसरात वीज मीटरची तपासणी करीत असतानां येथील काही घरगुती वीज ग्राहक महावितरणच्या मीटरमधून वीज पुरवठा न बायपास करून वीज वापर करीत असल्याचे निदशर्नास आले. भारतीय वीज कायदयातील कलम १३५ अन्वये या ग्राहकांच्या विरोधात कारवारी करण्यात येऊन त्यांना ८० हजार ६५० रुपयांचे देयक देण्यात आले. या सर्व वीज ग्राहकांनी एकूण १५५७० युनिट्सची मागील २ वर्षात वीज चोरी केल्याचे निदर्शनास आले त्या आधारे वरील मूल्यांकन करून देयक देण्यात आले. वरील सर्व वीज ग्राहकांनी देयकाची रक्कम जमा केली.
वर्धा शहर उपविभागात येणाऱ्या गोंड प्लॉट परिसरात महावितरणच्या स्थानिक पथकाने २ वीज चोऱ्या पकडल्या. यातील एका वीज ग्राहकाने वीज खांबावरून येणार महावितरणचा वीज पुरवठा टाळून थेट वीज पुरवठा घेतला होता. हे बाब महावितरणच्या वर्धा येथील कर्मचाऱ्यांना निदशर्नास आली. हा प्रकार मागील २ वर्षांपासून सुरु होता. या वीज ग्राहकाने १२७२ युनिट्सची वीज चोरी केल्याचे निदर्शनास आले. त्याला १६,३७० रुपयांचे वीज वापराचे आणि ४ हजार रुपये कंपाऊंडिंगचे असे एकूण २० हजार ३७० रूपांचे देयक देण्यात आले. दुसरी वीज चोरी याचा भागात पकडण्यात आली. सदर वीज ग्राहकाने घरगुती वीज पुरवठ्यावरून दुकानासाठी वीज वापर करीत असल्याचे निदशर्नास आले. या वीज ग्राहकाला ५४ हजार ३७० रुपयांचे देयक देण्यात आले.