Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, फेब्रुवारी १४, २०१९

नागपूरच्या शिक्षकाला मलेशियात IFMA पुरस्कार

नागपूर/प्रतिनिधी:

नागपूरच्या केंद्रीय विद्यालय डिफेन्स,अंबाझरी येथील शिक्षक भोजराज रतीरामजी लांजेवार यांना मलेशियात इंटरनॅशनल इंडो मलेशियन फ्रेंडशिप अवार्डने सन्मानित करण्यात आले.७ फरवरी 2019 ला त्यांना मलेशियाची राजधानी क्वालालंपुर येथे मलेशियाचे प्रिंस (राजा) सुलैमान शाह अल्हाज यांच्या हस्ते हा इंटरनॅशनल इंडो मलेशियन फ्रेंडशिप अवार्ड भोजराज लांजेवार यांना प्रदान करण्यात आला.यावेळी समता साहित्य अकॅडमीचे अध्यक्ष डॉ.तांडेकर,(भारत),समता सा.अकाडेमी चे अध्यक्ष डॉ. वी. पुलाइन्थिरण दत्तुक शेरी (मलेशिया) प्रधानमंत्री कार्यालयाचे मुख्य डयूटी ऑफिसर मैडम हाजाह मारिया मेतुसीं, मिसेस भारत सुंदरी आंतरराष्ट्रीय शिल्पी अवस्थी,डॉ.तिरुमूर्ति नाडेसन ,नेशनल क्राइम प्रिवेंशन, अन्य देशाचे अधिकारी उपस्थित होते. 

' समाजसेवा व शिक्षण ' या कार्यासाठी दरवर्षी हा पुरस्कार देण्यात येतो 2018 चा हा पुरस्कार नागपूरच्या केंद्रीय विद्यालय डिफेन्स,अंबाझरी येथील शिक्षक भोजराज रतीरामजी लांजेवार यांना प्रदान करण्यात आला.डॉ.भोजराज लांजेवार हे गेल्या २१ वर्षांपासून शिक्षक सेवेत कार्यरत असून या अगोदर पुणे येथे केंद्रीय विद्यालय गणेश खिंड येथे 10 वर्षे नौकरी केली आहे.केंद्रीय विद्यालय,कोरबा,छत्तीसगढ़ येथे 11 वर्ष सेवा केली. डॉ. लांजेवार हे कवि,साहित्यिक,लेखक असून साहित्य क्षेत्रात यांना बरेच सम्मान प्राप्त झाले आहेत. स्वच्छ भारत सूंदर भारत चे स्वच्छता कार्यक्रम,पर्यावरण कार्यक्रम, वाहतूक नियम जागरूकता कार्यक्रम ग्लोबल वार्मिंग कार्यक्रम, बेटी बचाव, जल बचाव,पेड़ बचाव असे विविध कार्यक्रमात लांजेवार यांचा उत्स्फुर्त सहभाग आहे.

डॉ. लांजेवार यांना 7 राज्य स्तरीय पुरस्कार, 4 राष्ट्रीय पुरस्कार, 2 आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सम्मानित करण्यात आले आहे . महाराष्ट्र शासनाच्या उत्कृष्ट संशोधन सेवा गौरव पुरस्काराने केंद्रीय मंत्री हंसराज अहीर यांच्या हस्ते सम्मानित करण्यात आले. डॉ. लांजेवार यांना शहीद भगत सिंह पुरस्कार,मा तुझे सलाम क्रांति रत्न पुरस्कार,नेताजी सुभाष चंद्र बोस पुरस्कार,डॉ. ए. पी.जे. अब्दुल कलाम मिसाइलमैन पुरस्कार,श्री साई काव्य गौरव पुरस्कार,राष्ट्रीय लोकमुद्रा कला, साहित्य,संस्कृति पुरस्कार,शब्द सूर्य अलंकरण पुरस्कार, महात्मा फुले सम्मान, सामाजिक कार्यकर्ता सम्मान,मुम्बई, लोकमान्य टिळक आदर्श गुरु पुरस्कार,प्राइड ऑफ नेशन आंतरराष्ट्रीय पुरस्कार, महाराष्ट्र ज्योति गौरव पुरस्कार, अखिल भारतीय मराठी काव्य संमेलन निवड, अखिल भारतीय नक्षत्र काव्य संमेलन सन्मान,झाड़ी बोली साहित्य सम्मान,काव्य प्रेमी साहित्य सम्मान,साहित्य रत्न पुरस्कार,व असे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. त्यांच्या या कार्यामुळे शिक्षक वर्ग तसेच नागपूरचे नाव पुन्हा एकदा जगाच्या नकाशावर आले आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.