झाड फाऊंडेशन व विवेकानंद अकॅडेमी ह्यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित पर्यावरण विषयक जनजागृती ह्या कार्यक्रमात प्रसाद पाटील ह्यांनी आपले मत मांडले
आपले मत मांडताना ते म्हणाले कि आज मानव विसरला आहे कि पर्यावरण मानवी जीवनाचा भाग महत्वाचा भाग असून तो पर्यावरणाचा एक भाग आहे . मानव ज्या पर्यावरणावर जीवन जगात आहे. त्या पर्यावरणाची नाळ मानव आज तोडू बघत आहे . मानवाला जिवंत राहण्यासाठी हवा , पाणी , अन्न, ऊर्जा ह्या सर्वांची आवश्यकता आहे . आपण कधी विचार करत नाहीत कि हे सर्व आपल्याला निसर्गातून मिळते . ज्या स्रोतातून आपल्यला हे सर्व मिळते तेच आपण मागे नष्ट करीत आहोत . जंगल ,नदी , पर्वत , हवा हे सर्व मानवाने प्रदूषित व नष्ट केले आहेत. एवढेच काय मानवाने इतर सजीवांनाही नष्ट करायची जणूकाही शपथच घेतली आहे . आज प्राणी व पक्षांच्या जाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. परंतु यांच्या नंतर एक दिवस मानवाचा हि अंत जवळ आलेला असेल . पृथ्वीने ज्या प्रमाणे जीवनाची सुरुवात केली होती , त्यावरून कळते कि पृथ्वी चे लाडके असे कोणीही नाही . काळाच्या ओघात अनेक सजीव जन्माला आले . व नामशेष झाले . त्याचा इतिहास आज आपण अभ्यासतो . परंतु आपला इतिहास वाचणाऱ्या पुढील मानवजातीचा जन्म होण्यास अब्जावधी वर्ष लागतील . असे प्रसाद पाटील म्हणाले ह्यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी प्रसिद्ध युवा व्याख्याते शिवश्री विकास मराठे हे होते. तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रा.प्रसाद पाटील सर,विवेकानंद कॅरियर अकॅडेमि चे संचालक प्रशांत खुळे सर , छत्रपती युवा क्रीडा मंडळ धुळे जिल्हा नवनियुक्त अध्यक्ष कुणाल चौधरी हे होते . सदर कार्यक्रम यशस्वी व्हावा ह्यासाठी विवेकानंद कॅरियर अकॅडेमि व झाड फाऊंडेशन संपूर्ण टीम ने प्रयत्न केले.