गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या मुलाने भारतीय सैन्यांचे केले अभिनंदन
चंद्रपूर/प्रतीनिधी:
पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा भारताने १२ दिवसानंतर बदला घेतला. भारतीय
वायुसेनेने पाकिस्तानमध्ये घुसून बॉम्ब हल्ला चढवला. या हल्ल्यात पाकिस्तान
हद्दीतील बालाकोट येथील अतिरेक्यांचे अड्डे उद्धवस्त केलेत.पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये घुसून अतिरेक्यांच्या तळावर हल्ला केला
त्यामध्ये ३०० च्या वर अतिरेकी ठार झाले आहेत. या कारवाईनंतर देशात जल्लोष
साजरा होत असताना चंद्रपुरात भारतीय वायुदलाच्या या असामान्य शौर्याचा गौरव कमल स्पोर्टींग क्लब,
चंद्रपूरच्या वतीने करीत नागरिकांना लाडु वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात
आला.
काश्मीरातील पुलवामा येथे दि. 14 फेब्रुवारी रोजी झालेल्या भ्याड हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या जवानांची शहादत वाया जाणार नाही असे ठणकावुन सांगीतले होते. देशाला शब्द दिला होता. सरकारने भारतीय सैन्यांना कारवाईची मुभा दिली होती. त्यानुसार आज हवाई दलाच्या योध्दîा सैनिकांनी आपल्या जहाबाज शहीद जवानांचा बदला घेत शेकडो दहशतवादîांना यमसदनी धाडले असुन पाकव्याप्त काश्मीरातील दहशतवादîांचे तळ उध्द्वस्त केले असुन भारतीय वायुदलाच्या या असामान्य शौर्याचा गौरव कमल स्पोर्टींग क्लब, चंद्रपूरच्या वतीने करीत नागरिकांना लाडु वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
याप्रसंगी कमल स्पोर्टींग क्लबचे जिल्हाध्यक्ष तसेच केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांचे चिरंजीव रघुवीर अहीर, युवा नेते मोहन चैधरी, , तेजा सिंग, राहुल गायकवाड, मयुर झाडे, शिवम त्रिवेदी, अभिनव लिंगोजवार, प्रणय डंबारे, ऋतूजा नागापूरे, रोशनी नागापूरे, श्रुती जीवने, राहुल बोरकर, विशाल बुरडकर, रघुगंशी गुंडला, संगम दहागावकर यांचेसह शेकडो युवक उपस्थित होते.
यावेळी उपस्थित युवकांनी सैनिकांच्या कारवाईचा अभिमान वाटतो अशा शब्दात या कारवाईचे स्वागत केले. ’भारत माता की जय’ असे नारे देत उपस्थितांनी या कारवाईचे स्वागत करून संपूर्ण देश या सैनिकांच्या पाठीशी उभा असल्याची भावना यावेळी व्यक्त केली.