Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, फेब्रुवारी २७, २०१९

थकबाकी वसुलीसाठी महावितरणचा धडाका

साडेसोळा हजारावर थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित

नागपूर: दीर्घकाळ वीज बिलाची थकबाकी असलेल्या आणि वारंवार करूनही तिने भरणाऱ्या वीज ग्राहकांचा वीज पुरवठा तोडण्याची कारवाई करण्यात येत आहे. महावितरणच्या नागपूर परिक्षेत्रातील अकराही जिल्हे मिळून एकट्या फेब्रुवारी महिन्यात तब्बल 16 हजार 589 घरगुती, वाणिज्यिक आणि औद्योगिक ग्राहकांचा वीज पुरवठाखंडित करण्यात आला असून त्यापैकी काहींचा वीजपुरवठा कायमस्वरूपी खंडित झाला आहे. ग्राहकांनी वीजबिलांचा नियमितपणे भरणा करून वीजपुरवठा खंडित होण्याची कटू कारवाई टाळण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

वीज बिलांची थकबाकी असणाऱ्यांचा वीजपुरवठा तोडण्याची कारवाई महावितरणकडून सातत्याने करण्यात येते मात्र सध्या आर्थिक वर्षातील शेवटचा महिना असल्याने आणि अनेक महिने वीज बिल न भरलेल्या ग्राहकांची संख्या वाढल्याने महावितरण कडून वसुलीचा धडाका सुरू करण्यात आला आहे. वीज ग्राहकांकडे महावितरणच्या मासिक बिलाचा एक रुपयाही थकीत राहणार नाही, या ध्येयाने या मोहिमेमध्ये सर्वच अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले आहेत तर थकबाकीचा भरणा न झाल्यास कोणत्याही स्थितीत य्जकबाकीदाराचा वीज पुरवठा खंडित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत त्यानुसार वीज बिलाची वसुली आणि थकबाकीदारांविरुद्धच्या कारवाईला वेग आला आहे

फ़ेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातील महावितरणच्या नागपूर परिक्षेत्रातील एकूण 1 लाख 76 हजार 979 वीज ग्राहकांकडे एकूण 70 कोटी 31 लाखाची थकबाकी होती, त्यापैकी या विशेष शुन्य थकबाकी मोहिमेत 1 लाख 1 हजार 209 ग्राहकांकडून 22 कोटी 91 लाख रुपयांची वसुली करण्यात आली आहे तर 10 हजार 498 थकबाकीदारांचा वीजपुरवठा तात्पुरत्या स्वरूपात आणि 6 हजार 91 थकबाकीदारांचा वीजपुरवठा कायमस्वरूपी खंडित करण्यात आला. यापैकी तब्बल 5 हजार 349 ग्राहकांचा वीजपुरवठा मागिल आठवड्याभरात खंडित करण्यात आला. यात सर्वाधिक अकोला परिमंडलातील 7 हजार 148 ग्राहकांचा समावेश असून त्याखालोखाल अमरावती परिमंडलातील 5 हजार 137 ग्राहकांचा समावेश आहे, याशिवाय नागपूर परिमंडलातील 2 हजार 6, चंद्रपूर परिमंडलातील 1 हजार 643 तर गोंदीया परिमंडलातील 655 थकबाकीदार वीज ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. त्यापैकी 3593 ग्राहकांनी रितसर पुनर्जोडणी शुल्क आणि थकबाकीचा भरणा केल्याने त्यांचा वीजपुरवठा पुर्ववत जोडण्यात आला आहे. उर्वरीत थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याचे काम सर्वत्र मोठ्या प्रमाणात सुरु आहे. तत्पुर्वी जानेवारी महिन्यातही नागपूर परिक्षेत्रातील तब्बल 16 हजार 762 थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडीत करण्यात आला होता. वीज पुरवठा खंडित केल्यानंतरही अनधिकृतपणे वीज वापर केल्यास थेट फौजदारी कारवाई केलीजाणार असल्याचे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे.


थकबाकीदार ग्राहकांचा जिल्हावार तपशिल
जिल्हा
1 फ़ेब्रुवारी रोजी एकूण थकबाकी
थकबाकीचा भरणा
वीजपुरवठा खंडीत
थकबाकीदार
रक्कम (कोटी रु)
ग्राहक संख्या
रक्कम (कोटी रु)
तात्पुरता
कायमस्वरुपी
अकोला        
15956
12.09
6933
3.65
943
1059
बुलढाणा      
23722
13.85
9256
3.03
720
1697
वाशिम        
9581
10.32
3107
2.10
1448
1281
अकोला परिमंडल एकूण          
49259
36.26
19296
8.77
3111
4037
अमरावती      
30267
10.91
17494
3.97
2392
158
यवतमाळ       
22251
7.21
11171
2.12
2354
233
अमरावती परिमंडल एकूण                 
52518
18.12
28665
6.09
4746
391
चंद्रपूर मंडल      
14692
2.62
11535
1.68
341
214
गडचिरोली मंडल      
14859
2.35
10482
1.33
490
598
चंद्रपूर परिमंडल एकूण                
29551
4.97
22017
3.01
831
812
भंडारा     
5499
0.83
4474
0.44
273
93
गोंदीया          
6767
1.13
4715
0.57
138
151
गोंदीया परिमंडल एकूण
12266
1.97
9189
1.01
411
244
नागपूर
21531
6.79
13220
2.69
794
415
वर्धा      
11854
2.20
8822
1.33
605
192
नागपूर परिमंडल एकूण                    
33385
9.00
22042
4.02
1399
607
नागपूर परिक्षेत्र एकूण
176979
70.31
101209
22.91
10498
6091


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.